Parner Assembly : पारनेरची जागा ठाकरेंना जाणार? शिवसैनिकाने लंकेना आठवण करून दिला लोकसभेतील शब्द

Parner Assembly : पारनेरची जागा ठाकरेंना जाणार? शिवसैनिकाने लंकेना आठवण करून दिला लोकसभेतील शब्द

Assembly Election 2024 :  खासदार निलेश लंके हे जुने शिवसैनिक असून शिवसैनिकांच्या भावना त्यांना समजत आहेत आणि आपल्या भावनांचा विचार करुनच महाविकास आघाडीतील मोठा भाऊ या नात्याने लहान भाऊ असलेल्या शिवसेनेला पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) जागा देण्याबाबत नक्कीच सकारात्मक विचार करतील व आपण लोकसभेला केलेल्या मदतीचा विचार करुन आपल्याला न्याय देतील, असा विश्वास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पारनेर तालुका प्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांनी व्यक्त केला.

Oscars Nomination: ऑस्कर पुरस्कारांसाठी नामांकन भरण्यास सुरूवात या तारखेपर्यंत करता येणार अर्ज

भगवा सप्ताहनिमित्त आयोजित भव्य मशाल यात्रेच्या अळकुटी येथील समारोपप्रसंगी बोलत होते. पुढे बोलताना डॉ.श्रीकांत पठारे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीदरम्यान तालुक्यात काही राजकीय घडामोडी झाल्या पण आपण सर्व शिवसैनिकांनी एकत्र येऊन ठाम निर्णय करुन महाविकासआघाडीसोबतच राहून खासदार निलेश लंके यांना पारनेर तालुक्यातून मताधिक्य मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला आणि त्यांना निवडून आणले आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान महाविकासआघाडीतील वरीष्ठ नेत्यांच्यासोबत झालेल्या बैठकीत खासदार निलेश लंके यांनी खासदार झाल्यावर विधानसभेची पारनेर-नगरची जागा शिवसेनेला देण्याचा शब्द दिला होता आणि त्यांचा शब्द ते कायम सार्थ करतात असाही सर्वांना अनुभव असल्याने ते महाविकासआघाडीतील मोठ्या भावाची भुमिका विधानसभेला निभावतील व शिवसेनेला संधी देण्यासाठी पुढाकार घेतील असा मला ठाम विश्वास असल्याचे मत डॉ.श्रीकांत पठारे यांनी व्यक्त केले.

मातोश्रीत बसून धमकीची भाषा षंढच करू शकतो; मोदी-फडणवीसांसाठी राणेंनी तलवार उपसली

यावेळी युवासेना तालुकाप्रमुख अनिल शेटे, महिला आघाडी तालुकाप्रमुख प्रियांका खिलारी, जेष्ठ नेते डॉ.भास्कर शिरोळे, बाजार समिती संचालक किसन सुपेकर, गटप्रमुख संतोष येवले, गणप्रमुख संतोष साबळे, विभागप्रमुख सखाराम उजगरे, गटप्रमुख बाबासाहेब रेपाळे, गणप्रमुख नितीन आहेर, शेतकरी आघाडी उपतालुकाप्रमुख किसन चौधरी यासह शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube