Nilesh lanke : मोठी बातमी! 15 दिवसात चौकशी होणार, निलेश लंके यांचे उपोषण मागे
Nilesh lanke : अहमदनगरचे खासदार निलेश लंके (Nilesh lanke) गेल्या चार दिवसांपासून अहमदनगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील (Ahmednagar Local Crime Investigation) भ्रष्टाचाराविरोधात जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. आज लंके यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अशक्तपणा जाणवत असल्याने सलाईन लावण्यात आली होती. सलाईन लावून खासदार लंके यांनी आपले काम सुरू ठेवले होते.
तर दुसरीकडे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या मध्यस्थीमुळे गेल्या चार दिवसांपासून सुरु असणारा उपोषण खासदार लंके यांनी सोडला आहे. नीलेश लंके यांच्या तक्रारींची 15 दिवसात निष्पक्ष चौकशी करू असं राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी आश्वासन दिला आहे.
तर निलेश लंके यांच्या मागण्या मान्य करून नाशिक ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिलखेरकर यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याचा लेखी आश्वासन नाशिक विभागीय पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिले आहे. तसेच ही चौकशी इन कॅमेरा होणार असल्याचे देखील आश्वासन पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिले. यानंतर आज खासदार निलेश लंके यांनी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात त्यांच्या उपस्थित उपोषण सोडले आहे.
खासदार लंके यांनी मोठ्या प्रमाणात पोलिसांविरोधात भ्रष्टचाराचे तक्रारी आल्याने पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात अहमदनगर पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर 22 जुलैपासून उपोषणाला सुरुवात केली होती.
मोठी बातमी! राष्ट्रपती दरबार हॉल आणि अशोक हॉलचे नामकरण, जाणून घ्या नवीन नावे
भ्रष्टचाराचे आरोप होत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात निलंबित कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे खासदार निलेश लंके यांनी सांगितले होते.