Download App

नाशकात 30 तासांची धाड, मिळालं 26 कोटींचं घबाड; पाचशेच्या नोटांचा पडला खच

नाशिकमध्ये एका सराफा व्यावसायिकाशी संबंधित मालमत्तांवर छापेमारी करण्यात आली. तब्बल तीस तास ही कारवाई सुरू होती.

Nashik IT Raid : करबुडवे करणारी मंडळी आयकर विभागाच्या रडारवर आली आहे. मागील काही दिवसांपासून आयटी विभागाकडून धाडसत्र राबवण्यात येत आहे. नांदेडमध्ये छापेमारी करून मोठी रोकड जप्त करण्यात आली होती. त्यानंतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाशिककडे मोर्चा वळवला. येथे एका सराफा व्यावसायिकाशी संबंधित मालमत्तांवर छापेमारी करण्यात आली. तब्बल तीस तास ही कारवाई सुरू होती. या छापेमारीत 26 कोटी रुपयांची रोख रक्कम आणि 90 कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचे कागदपत्र जप्त करण्यात आले.

या कारवाईसाठी नाशिक, नागपूर आणि जळगावातील अधिकारी एकत्र होते. त्यांनी या कारवाईत जवळपास 26 कोटींची रक्कम जप्त केली आहे. या जप्त केलेल्या पैशांची मोजणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना 14 तासांचा वेळ लागला. या पैशांची मोजणी करण्यासाठी आयकर विभागाची सात वाहने बोलावण्यात आली होती. ही कारवाई जवळपास तीस तास चालली होती.

Ground Report : नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांचं वजन वाढलं… त्यांची मतेच ठरवणार ‘नाशिकचा’ खासदार!

पथकाने शहरातील एका सराफ व्यावसायिकाबरोबरच त्याच्या रिअल इस्टेट कार्यालयावरही छापा टाकला. एका स्वतंत्र पथकाने आलिशान बंगल्याची तपासणी केली. शहरातील विविध ठिकाणची कार्यालये, वैयक्तिक लॉकर आणि बँकांचे लॉकरचीही तपासणी करण्यात आली. मनमाड आणि नांदगाव येथील व्यावसायिकाच्या नातेवाईकांच्या घरांचीही तपासणी करण्यात आली.

नाशिक शहरात एका सराफा व्यावसायिकाकडे इतक्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडल्याने खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे शहरातील अन्य व्यापाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत. या कारवाईनंतर पुढचा नंबर कुणाचा असा सवाल विचारला जाऊ लागला आहे. या छापेमारीनंतर पुढे काय कारवाई केली जाणार याची जोरदार चर्चा शहरात सुरू झाली आहे.

दरम्यान, याआधी आयकर विभागाने नांदेडमध्ये अशीच कारवाई केली होती. या कारवाई अधिकाऱ्यांनी तब्बल 170 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त केली होती. या कारवाईत पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नांदेड आणि परभणीतील अधिकाऱ्यांना सोबत घेण्यात आले होते. या शहरांतून 25 वाहनांतून 60 पेक्षा जास्त अधिकारी नांदेडमध्ये आले होते. या कारवाईत एकूण 14 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती आणि 8 किलो वजनाचे दागिने जप्त करण्यात आले होते.

काँग्रेसचा राज्यातील बडा नेता आयकरच्या रडारवर; 9 वर्षांपासून अध्यक्ष असलेल्या सुतगिरणीवर छापेमारी

follow us

वेब स्टोरीज