Eknath Khadse : भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलेच रुळले आहेत. खडसे त्यांचे कट्टर राजकीय विरोधक देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. राज्यात भाजपाचा (BJP) विस्तार करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या खडसे यांनी आता आपली राजकारणातील मोठी चूक कोणती होती यावर भाष्य केले आहे.
भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) तिकीटावर उमेदवारी घेण्याबाबत शरद पवार (Sharad Pawar) आपल्याला सांगत होते. मात्र, आपण त्यावेळी त्यांचं ऐकलं नाही ही आपली मोठी चूक झाली. त्यामुळे आपली पाच वर्षे वाया गेली, असे खडसे (Eknath Khadse) यांनी सांगितले. खडसे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त जळगावात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात खडसे बोलत होते.
मध्य प्रदेशात भाजपला भलमोठं खिंडार, दोन आमदारांसह 10 नेत्यांचा पक्षाला रामराम, कॉंग्रेसमध्ये प्रवेश
खडसे (Eknath Khadse) पुढे म्हणाले, 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर उमेदवारी घ्या, असे शरद पवार यांनी मला सांगितले होते. पण. मी त्यांचं ऐकलं नाही. ही एक चूक होती. भाजपमध्ये असतानाही त्या निवडणुकीत पक्षाने मला तिकीट दिले नाही. त्यामुळे माझी पाच वर्षे वाया गेली. इतकी वर्षे भाजपाचा विस्तार करण्यात घालवली त्यामुळे पक्ष सोडून जाण्याचा विचार मनात येत नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसधमध्ये शरद पवार आपल्याला सांगत होते. मी संभ्रम अवस्थेत होतो.
2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने खडसे (Ekanth Khadse) यांना तिकीट दिले नव्हते. त्याऐवजी खडसे यांची मुलगी रोहिणीताई खडसे (Rohini Khadse) यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. भाजपातीलच काही गद्दारांनी त्यांना पाडण्यासाठी काम केले असे एकनाथ खडसे त्यावेळी म्हणाले होते. या घडामोडींनंतर खडसे भाजपवर नाराज झाले. त्यांच्या नाराजीच्या बातम्या येतच होत्या. यातच त्यांनी 23 ऑक्टोबर 2020 रोजी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जर त्यावेळी मला शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला नसता तर माझं राजकीय करिअर संपुष्टात आलं असतं असे खडसे त्यावेळी म्हणाले होते.
‘हिंमत असेल तर कारवाई करून दाखवा’; पटोलेंचे अजितदादांना आव्हान