‘हिंमत असेल तर कारवाई करून दाखवा’; पटोलेंचे अजितदादांना आव्हान

‘हिंमत असेल तर कारवाई करून दाखवा’; पटोलेंचे अजितदादांना आव्हान

Maratha Reservation Agitation : जालन्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर (Maratha Reservation Agitation) झालेल्या लाठीमाराच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. काल अनेक ठिकाणी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. राजकीय नेत्यांनीही गावात येऊन आंदोलकांची भेट घेतली. राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना थेट आव्हान दिले आहे.

हिंमत असेल तर त्यांनी कारवाई करून दाखवावी असे आव्हान पटोले यांनी दिले. लाठीचार्ज (Maratha Reservation Agitation) करणाऱ्यांवर अजितदादा कारवाई करणार नाहीत कारण, त्यांचे उपमुख्यमंत्रीपद जाईल, असा खोचक टोला पटोलेंनी लगावला. नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आंदोलकांवरील लाठीमार प्रकरणी राज्य सरकावर घणाघाती टीका केली.

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही; CM शिंदेंचा मराठा समाजाला शब्द

जालन्यात मोठ्या प्रमाणात लाठीमार (Maratha Reservation Agitation) झाला. ज्यांनी लाठीमार करण्याचे आदेश दिले तेच खरे गुन्हेगार आहेत. वेड्यांच्या सरकारमध्ये अजित पवार यांनी वेडे बनू नये असेही पटोले म्हणाले. पटोले यांनी या प्रकाराचा निषेध करत सरकारवर जोरदार टीका केली. मुंबईतील इंडिया बैठकीवरून लक्ष हटविण्यासाठीच हा लाठीमार करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला.

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही – शिंदे

मला मराठा समाजाच्या वेदनांची जाणीव आहे. मराठी समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. आजवर अत्यंत शांततेनं, संमजसपणे मराठा समाजाने आपली आंदोलन केलं. भावना व्यक्त केल्या. माझी मराठा समाजाला हात जोडून विनंती आहे की, त्यांनी संयम राखावा, कायदा हातात घेऊ नये, असं आवाहन शिंदेंनी केलं.

महाविकास आघाडीच्या काळात कधीही ‘लाठीचार्ज’ झाला नाहीत, उद्धव ठाकरेंचा जालन्यातू हल्लबोल

हा समाज आरक्षणासाठी लढतो. आजवरचे मोर्चे शांततेने काढले होते. त्याला कुठंही गालबोट लागलं नाही. मात्र, आता काही स्वार्थी राजकीय नेते स्वार्थ साधण्याच प्रयत्न करत आहेत. सर्वाधिक काळ सत्तेत असलेल्या आणि आता विरोधात असलेल्या नेत्यांनीही अशा प्रवृत्तीना खतपाणी घालू नये, असे सीएम शिंदे म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube