Download App

तिकीटासाठी गोडसेंची धावाधाव; भुजबळ म्हणतात, जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत…

Chhagan Bhujbal Comment on Nashik Lok Sabha : महायुतीत नाशिक मतदारसंघ कमालीचा वादग्रस्त ठरला आहे. या मतदारसंघावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने दावा ठोकला आहे. छगन भुजबळ यांची (Chhagan Bhujbal) उमेदवारी येथे निश्चित मानली जात आहे. तर दुसरीकडे शिंदे गटही दावा सोडायला तयार नाही. खासदार हेमंत गोडसे आज (Hemant Godse) पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहेत. तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनीही सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे या मतदारसंघासाठी महायुतीचे नेते काय निर्णय घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

भुजबळ म्हणाले, जोपर्यंत अधिकृतपणे जाहीर होत नाही तोपर्यंत महायुतीतील प्रत्येक घटकपक्षाला ही जागा मागण्याचा अधिकार आहे. ज्यावेळी उमेदवाराचे नाव जाहीर होईल त्यावेळी आम्ही सगळे एकत्रित काम करू. नाशिकची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे इतर काही ठिकाणच्या वाटाघाटी झाल्या आहेत. काही ठिकाणी दुसऱ्या टप्प्यातील अर्ज भरण्याच प्रक्रिया सुरू झाली आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.

Chhagan Bhujbal : नाशिकमधून लोकसभा लढणार का? भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

दरम्यान, नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे हे तसे शांत आणि संयमी समजले जातात. आधी मनसे आणि आता शिवसेना अशा पक्षांमध्ये काम करुनही गोडसे इतर आमदार-खासदारांप्रमाणे कधी आक्रमक झालेले ऐकीवात नव्हते. काही दिवसांपासून मात्र ते आक्रमक झालेले दिसून येत आहेत. त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन ठिय्या दिला. दादा भुसे आणि गोडसे यांच्यातील सुप्त संघर्ष नवीन नाही. पण ते भुसेही गोडसेंसोबत या ठिय्यामध्ये होते.

काही दिवसांपूर्वी एका जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधून हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची केलेली घोषणा केली होती. पण गोडसे यांच्यारुपाने सेनेच्या ताब्यातील हा मतदारसंघ खेचून घेण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी ही घोषणा रुचली नाही. गोडसे यांच्यावर युतीधर्म पाळला नसल्याचे टिकास्त्र सोडले. भाजप एकतर उमेदवार बदला अन्यथा, जागा आम्हाला द्या, या भूमिकेवर अडून बसल्याचे सांगितले जाते.

‘नाशिक लोकसभा मतदारसंघ आमचाच’ हेमंत गोडसेंनी ठणकावूनच सांगितलं

follow us