Chhagan Bhujbal on Nashik Lok Sabha : नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारीचा तिढा अजूनही सुटलेला नाही. या मतदारसंघावरील अजित पवार गटाचा दावा अजूनही कायम आहे. छगन भुजबळ अजूनही निवडणूक लढण्यास तयार आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हेमंत गोडसे यांच्यासाठी नाशिक हवे आहे. यासाठी पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडत आहेत. यातीलच एका खास घडामोडीचा उल्लेख आज अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना केला.
छगन भुजबळ म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला आणि विचारलं की तु्म्ही शिरूरमधून लढता का? त्यांचा हेतू असा होता की मी जर तिकडे गेलो तर नाशिकचा तिढा सुटेल. यात त्यांची काही चूक नाही. पण मी त्यांना सांगितलं. ओबीसी समाज महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी आहे. मी त्या ठिकाणी जाऊन फक्त भाषण करत असतो. पण, माझा सर्वात जास्त संबंध नाशिकमध्ये येतो. नाशिक मी मागितलेलं नाही. तरी देखील मिळत असेल तर नाशिक सोडून दुसऱ्या कुठेही जाऊन उभा राहिल असं माझं म्हणणं नाही. पण नाशिक सोडून कुठेही जाणार नाही. नाशिक ठरलेलं आहे.
Chhagan Bhujbal : हेमंत गोडसेंचा लोकसभेचा मार्ग मोकळा, छगन भुजबळांची माघार !
प्रीतम ताईचं काही अडलं नाही. मी ताईला नाशिकमधून उभं करेन. तुम्ही काही काळजी करू नका असं वक्तव्य केलं होतं. त्यावर भुजबळ म्हणाले, पंकजा मुंडे यांनी आपल्या निवडणुकीत लक्ष द्यावे. आमच्याकडे उमेदवार नाहीत असं नाही. नाशिकमध्ये आमच्याकडे खूप उमेदवार आहेत. पंकजा मुंडेंनी बीडमध्ये लक्ष द्यावे.
दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी महायुतीकडून प्रबळ उमेदवार म्हणून अन्य पर्यायांचा विचार केला जात असल्याच्या चर्चा आहेत. तर मंत्री छगन भुजबळांनी या जागेवर राष्ट्रवादीचा दावा कायम असल्याचे सांगत 3 इच्छुक उमेदवारांची नावे सांगितली होती. नाशिक लोकसभा मतदारसंघात भुजबळ नसल्यास एक सर्वसमावेशक आणि प्रबळ उमेदवार म्हणून अन्य पर्यायांचा विचार करण्यात यावा अशी मागणी भाजप नेत्यांकडून होत आहे. यामुळे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.