Download App

“आधी बीडच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करा”; भुजबळांनी पंकजा मुंडेंना सुनावलं

पंकजा मुंडे यांनी आपल्या निवडणुकीत लक्ष द्यावे. आमच्याकडे उमेदवार नाहीत असं नाही. नाशिकमध्ये आमच्याकडे खूप उमेदवार आहेत.

Chhagan Bhujbal replies Pankaja Munde : बीड लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी (Pankaja Munde) नाशिकच्या उमेदवारीबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटू लागले आहेत. अजित पवार गटाच्या नेत्यांना त्यांचं हे वक्तव्य पटलेलं नाही, असंच दिसत आहे. आज राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) पंकजांना चांगलेच फटकारले. छगन भुजबळ यांनी आज नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याबाबत विचारले होते.

भुजबळ म्हणाले,  पंकजा मुंडे यांनी आपल्या बीड लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत लक्ष द्यावे. आमच्याकडे उमेदवार नाहीत असं नाही. नाशिकमध्ये आमच्याकडे खूप उमेदवार आहेत. त्यामुळे पंकजा मुंडेंनी बीडमध्ये लक्ष द्यावे अशा शब्दांत छगन भुजबळांनी पंकजा मुंडेना नाशिकच्या निवडणुकीत लक्ष देऊ नका असेच सांगून टाकले आहे. त्यांच्या या वक्तव्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

छगन भुजबळांना थेट दिल्लीतून निरोप, नाशिक लोकसभेची तयारी सुरू करण्याचे दिले आदेश

काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?

प्रीतम ताईचं काही अडलं नाही. मी ताईला नाशिकमधून उभं करेन. तुम्ही काही काळजी करू नका, मी प्रीतम ताईला विस्थापित होऊ देणा नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा अजूनही सुटला नसल्याचे दिसून येत आहे.

हेमंत गोडसेंचा पत्ता कट होणार ?

दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी महायुतीकडून प्रबळ उमेदवार म्हणून अन्य पर्यायांचा विचार केला जात असल्याच्या चर्चा आहेत. तर मंत्री छगन भुजबळांनी या जागेवर राष्ट्रवादीचा दावा कायम असल्याचे सांगत 3 इच्छुक उमेदवारांची नावे सांगितली होती. नाशिक लोकसभा मतदारसंघात भुजबळ नसल्यास एक सर्वसमावेशक आणि प्रबळ उमेदवार म्हणून अन्य पर्यायांचा विचार करण्यात यावा अशी मागणी भाजप नेत्यांकडून होत आहे. यामुळे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नाशिकसाठी CM शिंदेंचा आटापिटा; भुजबळांनी मात्र एकाच वाक्यात पिक्चर क्लिअर केला

follow us