छगन भुजबळांना थेट दिल्लीतून निरोप, नाशिक लोकसभेची तयारी सुरू करण्याचे दिले आदेश

छगन भुजबळांना थेट दिल्लीतून निरोप, नाशिक लोकसभेची तयारी सुरू करण्याचे दिले आदेश

Chhagan Bhujbal : राज्यात अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा गुंता सुटलेला नाही. महायुतीत काही जागांवरून ताणाताणी सुरू आहे. त्यात नाशिक मतदारसंघाचे नाव आहे. या मतदारसंघात शिंदे गटाचा खासदार आहे. त्यामुळे ही जागा आपल्यालाच मिळावी असा दावा शिंदे गटाने केला आहे. भाजपनेही या जागेसाठी जोर लावला आहे. तर मनसेही नाशिकसाठी आग्रही असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) या मतदारसंघातून इच्छुक असल्याच्या बातम्या येत आहे. आता तर छगन भुजबळ यांना थेट दिल्लीतून निरोप आल्याने महायुतीतील घटक पक्षांना धडकी भरली आहे. या निरोपातून त्यांना निवडणुकीची तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते.

Chhagan Bhujbal : “लहान पक्षही मोठे होतात” छगन भुजबळांचा बावनकुळेंना खोचक टोला

नाशिक मतदारसंघात महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने आज राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली. मात्र महायुतीतील घोळ अजूनही मिटलेला नाही. हा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जाईल हे सुद्धा अजून ठरलेलं नाही. अशा परिस्थितीत उमेदवारांची अजून चर्चाच नाही. त्यातही या मतदारसंघावर शिंदे गटाने दावा केला आहे. मनसेनेही हक्क सांगितला आहे. महायुतीत येण्यासाठी  मनसेकडून या मतदारसंघाची मागणी केली जात आहे. तर दोन दिवसांपूर्वी या मतदारसंघातील भाजप आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची (Devendra Fadnavis) भेट घेत जोरदार लॉबिंग केले होते.

या घडामोडींनी मतदारसंघात तिढा निर्माण झाला आहे. या तिढ्यात आता छगन भुजबळ यांची भर पडली आहे. छगन भुजबळ यांचेही नाव चर्चेत आले आहे. त्यांच्या उमेदवारीचे संकेत आता मिळत आहेत. त्यांना उमेदवारीसाठी तयार राहण्याच्या सूचना थेट दिल्लीतून आल्याची माहिती आता समोर आली आहे. यानंतर आज मंत्री छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेणार आहेत.

मराठा आरक्षणावर नाराज झालेल्या छगन भुजबळांची सरकार समजूत काढणार 

दरम्यान, काल माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले होते, की नाशिकचा उमेदवार कोणताही ठरो. मग तो राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा असो की भाजपाचा जो उमेदवार दिला जाईल त्याच्या पाठीमागे ताकदीने उभे राहू. भुजबळ कुटुंबियांसाठी कोणत्याही मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केलेली नाही. भुजबळ कुटुंब कोणत्याही जागेसाठी आग्रही नाही. कुटुंबातील एकाही व्यक्तीसाठी मी उमेदवारीची मागणी केलेली नाही असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज