महाविकास आघाडी सरकार पाडण्यात अजित पवारांची मदत; गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट!

Girish Mahajan : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारबाबत गौप्यस्फोट करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्यात अजित पवार (Ajit pawar) अर्थमंत्री असताना मोठी मदत झाली होती, असे खळबळजनक वक्तव्य महाजन यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्याच्या राजकारणात नवा वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. अजित […]

Ajit Pawar And Girish Mahajan

Ajit Pawar And Girish Mahajan

Girish Mahajan : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारबाबत गौप्यस्फोट करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्यात अजित पवार (Ajit pawar) अर्थमंत्री असताना मोठी मदत झाली होती, असे खळबळजनक वक्तव्य महाजन यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्याच्या राजकारणात नवा वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा मध्यंतरी समोर आल्या होत्या. त्यानंतर महाजन यांनी असे खळबळजनक वक्तव्य केल्याने राजकीय वाद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ग्रामविकास मंत्री महाजन आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. येथे व्यापारी गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला महाजन यांनी हजेरी लावली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.

‘मोदींनी मणिपूरमध्ये जाऊनचं दाखवावं’; अमेरिकेला निघालेल्या मोदींना उद्धव ठाकरेंचे चॅलेंज!

मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार 

मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला जाऊन आले आहेत. त्यामुळे आता मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल. सध्या खाते आणि नावानुसार चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. यावर महाजन म्हणाले, ठाकरे गटाला रोजच धक्के बसत आहेत. आणि पुढेही बसणार आहेत. सकाळच्या भोंग्याशिवाय त्यांच्यासोबत दुसरे कुणीही नाही. यानंतर अनेक आमदार आणि खासदारही त्यांना सोडून जाणार असल्याचे महाजन म्हणाले.

उद्धव ठाकरे भूमिका स्पष्ट करा 

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी काल औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. या मुद्द्यावर विचारले असत ते म्हणाले, कोणीही याचे समर्थन करणार नाही. उद्धव ठाकरेंचे याला समर्थन आहे का? प्रकाश आंबेडकर आधी काँग्रसे त्यानंतर शरद पवार यांच्याबरोबरही होते. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे महाजन म्हणाले.

कॉंग्रेसला विरोध करून गडकरींचा मोदी, शाहांना खूश करण्याचा प्रयत्न; कॉंग्रेस नेत्याची खोचक टीका

बीआरएसला महाराष्ट्रात काहीच मिळणार नाही 

उद्या शिवसेनेचा वर्धापनदिन आहे. वर्धापनदिनाला शुभेच्छा देताना महाजन म्हणाले, उद्धव ठाकरेंची अवस्था केविलवाणी झाली आहे. आमदार खासदार त्यांना सोडून जात आहेत. यात त्यांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा मिळत आहेत. भारत राष्ट्र समितीला महाराष्ट्रात काहीही मिळणार नाही. येथे राजकारणी आणि मतदार मुरलेले आहेत. त्यांना राज्यात आणण्यात भाजपचा काहीच संबंध नाही, असे उत्तर महाजन यांनी दिले.

Exit mobile version