Jayant Patil on Election : राज्यातील सध्याची राजकीय अस्थिरतेची परिस्थिती पाहता राज्यात कधीही विधानसभेच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात. तेव्हा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तयार राहिले पाहिजे. पक्षाला विजयी व्हायचे असेल तर गावपातळीपर्यंत संघटना मजबूत करावी लागेल. आधी पक्ष मजबूत करणे गरजेचे आहे त्यानंतर मतदारसंघ मागता येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
शिरसाटांना ‘ते’ वक्तव्य भोवणार.. दानवे म्हणाले, आता थेट गुन्हा दाखल करणार
धुळे जिल्ह्यातील साक्री येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पक्ष पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी काही जणांनी साक्री विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा अशी मागणी केली. येथे पक्षाने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे हा मतदारसंघ आता राष्ट्रवादीकडेच असावा अशी मागणी करण्यात आली.
त्यावर पाटील म्हणाले, की येथे आधी पक्ष संघटना बळकट करणे गरजेचे आहे. तेव्हा आधी पक्ष मजबूत करा. त्यानंतर गरज वाटल्यास हा मतदारसंघही राष्ट्रवादीकडे घेता येईल. सध्या बाजार समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन काम करावे लागणार आहे. कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न करावेत.
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण
सध्याचे राजकीय वातावरण पाहता वेळेआधीच कधीही निवडणुका जाहीर होऊ शकतात, असे एकनाथ खडसे यांनी देखील सांगितले. सध्या शिंदे -फडणवीस सरकार सत्तेत आहे. मात्र, हे सरकार कधीही पडू शकते असे विरोधकांकडून सांगण्यात येत आहे. सत्ताधारी मात्र सरकारला कोणतीही भीती नसल्याचे म्हणत असतात. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पुन्हा हा मुद्दा उपस्थित केला आहे.
सध्याचे राजकीय वातावरण अस्थिर असल्याचे मान्य केल्यास खरेच निवडणुका जाहीर होतील का, हा महत्वाचा प्रश्न आहे. यावर आता सत्ताधारी गटातील नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.