Rahuri News : महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांनी आज राहुरी शहरात (Rahuri News) अभूतपूर्व प्रतिसादात प्रचार फेरी काढली. परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. राहुरी शहरात विकासाचे (Elections 2024) अनेक प्रश्न प्रलंबित असून आमदार होताच शासनाच्या योजनांची अंमलबजावणी सुरू करणार आहोत. मागासवर्गीयांना हक्काचे घरकुल मिळवून देऊ, असा आशावाद नगर-राहुरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांनी व्यक्त केला.
बुधवारी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी राहुरी शहरात प्रचार फेरी काढून मोठं शक्तिप्रदर्शन केलं. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, उदयसिंह पाटील, तालुका अध्यक्ष सुरेश वाडकर, भास्कर गाडे, दादासाहेब सोनवणे, सुरेंद्र थोरात, शिवाजी सागर, आर.आर.तनपुरे, भैय्या शेळके, अक्षय तनपुरे, दिनेश जठार, देवेंद्र लांडे, सुजय काळे, गणेश खैरे, सचिन मेहत्रे, अरुण डोवले, शिवाजी डौले, उमेश शेळके, जीशान शेख, मीराताई घाडगे, अरुण साळवे, स्नेह साळवे, कांतीलाल जगधने, आबासाहेब डवले, अरुण डवले, नयन शिंदे आदी उपस्थित होते.
“आता २०१९ पुन्हा नाहीच, २३ तारखेला मी..” कर्डिलेंना फुल कॉन्फिडन्स!
कर्डिले पुढे म्हणाले, आजच्या या मिरवणुकीमध्ये हजारो नागरिक सहभागी झाले आहेत. निवडणूक संपल्यानंतर नगरपालिकेमध्ये सत्ता आणायची आणि विकास काय असतो हे राहुरी शहराला दाखवून देऊ. शहरातील पिण्याच्या पाण्याचे आणि आरोग्याचे प्रश्न प्रलंबित आहेत. शहरात घरकुल योजना राबवणार आहोत. आगामी काळात या सर्व कामांवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे शिवाजीराव कर्डिले यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले.
राहुरी तालुक्यातील प्रचारात युवा नेते अक्षय कर्डिले यांनीही पुढाकार घेतला आहे. युवकांचं मोठं संघटन त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे येथील प्रचारात कर्डिलेंना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले. राहुरी मतदारसंघात एकीकडे शिवाजीराव कर्डिले आपल्या जनसंपर्कातील नागरिकांना सोबत घेत मतदारसंघ पिंजून काढत आहेत. तर दुसरीकडे चिरंजीव अक्षय कर्डिले आपल्या युवा संघटनेच्या माध्यमातून मतदारसंघातील वाड्या, वस्त्या, गावांमध्ये पोहोचून प्रचार करत आहेत. या प्रचारादरम्यान, अक्षय कर्डिले यांना चांगला प्रतिसाद मिळत असून याचा मोठा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे.
“वांबोरी चारी टप्पा दोनच्या माध्यमातून सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार”, शिवाजीराव कर्डिले