Download App

Manoj Jarange : लोकसभेपूर्वी निलेश लंकेच्या बालेकिल्ल्यात जरांगेची सभा, कोणावर साधणार निशाणा?

  • Written By: Last Updated:

अहमदनगर – मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) लढा उभारणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी राज्यभर सभा घेतल्या. आरक्षणाच्या लढाईसाठी त्यांनी राज्यव्यापी आंदोलन केलं. मात्र अद्याप मराठा आरक्षणासंदर्भात ठोस असे पाऊल सरकारच्या वतीने उचलण्यात आले नसल्याने जरांगे हे पुन्हा एकदा राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहे. मराठा समाज बांधवांच्या भेटीगाठी ते घेत आहे. दरम्यान जरांगे यांची तोफ पुन्हा एकदा नगर जिल्ह्यातील (Ahmednagar) पारनेर तालुक्यात धडाडणार आहे.

आम्ही ठरवलं, गरज पडली तर रोजच बारामतीत येऊन बसू…; चंद्रकांत पाटलांचा मविआला इशारा 

काल लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यांनतर आता जरांगे यांची सभा पारनेरमध्ये पार पडणार आहे. आमदार निलेश लंके यांचा बालेकिल्ला असलेल्या पारनेर मतदार संघामध्ये येत्या 23 मार्च रोजी जरांगे यांची सभा पार पडणार आहे. या सभेत ते काय बोलणार हे पाहणे महत्वाचे आहे.

मराठा आरक्षणाचा लढा अद्यापही सुरु आहे. मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातून सुरु केलेल्या या लढ्याची धग राज्यभर पसरली. राज्यात ठिकठिकाणी मोठं मोठी आंदोलन, उपोषण झाली. यामुळे मोठ्या संख्येने मराठा समाज देखील एकवटला. दरम्यान मराठा समाजाची भावना लक्षात घेत राज्य शासनाकडून 10 टक्के आरक्षणाचा ठरावाला मंजुरी देण्यात आली. मात्र सगेसोयरे बाबतची अधिसूचनेवर सरकारकडून काही देखील हालचाली करण्यात आल्या नाही. यामुळे पुन्हा एकदा मराठा समाज बांधव संतापले आहे. मनोज जरांगे यांनी यासाठी आता राज्याचा दौरा सुरु केला आहे.

‘शिवतीर्था’वर ‘इंडिया आघाडी’ची तोफ धडाडणार! ‘हा शिवसेनेसाठी काळा दिवस’ CM शिंदेंची बोचरी टीका 

जरांगे नगर जिल्ह्यातील पारनेर मध्ये सभा घेणार आहे. त्यानुषंगाने आता समाज बांधवांकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आलेली आहे.

या ठिकाणी सभा पार पडणार
संघर्ष योद्धा म्हणून ओळख असलेले मनोज जरांगे यांची सभा ज्या ठिकाणी पार पडणार आहे त्या ठिकाणाला देखील एक वेगळाच इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून पारनेर बाजार तळाला सामाजिक, राजकीय व विविध चळवळींच्या सभांचा इतिहास आहे. स्वातंत्र्य संग्रामात थोर क्रांतिकारक सेनापती बापट यांच्या सभांनी पारनेरचा बाजारतळ दणाणला आहे. स्वातंत्र्यप्राप्ती नंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळी दरम्यान सेनापती बापट यांच्यासह एस. एम. जोशी, प्र. के. अत्रे यांची पारनेर बाजार तळावरील भाषणे गाजली आहेत. असा इतिहास असलेल्या या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची २३ मार्च रोजी महासंवाद बैठक पार पडणार आहे.

 

 

follow us