Maratha Reservation : राज्य सरकारने मराठा समाजाला विशेष अधिवेशन घेऊन 10 टक्के आरक्षण (Maratha Reservation) देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे ओबीसीमधून आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांच्या सभांना आणि कार्यक्रमांना विरोध करण्याची भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. यापार्श्वभूमीवर अहमदनगरच्या दौऱ्यावर येत असलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा मराठा समाजाने दिला आहे. परंतु त्यापूर्वीच मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
नारायण राणे यांनी ओबीसीमधून मराठा आरक्षणाला विरोध केला होता. मराठा समाज हे आरक्षण स्विकारणार नाहीत. स्वाभिमानी मराठा कुणबीमधून आरक्षण घेणार नाही. असे आरक्षण घेतल्यास ओबीसी समाजावर अतिक्रमण होणार आहे, असे म्हटले होते. यावरुन मनोज जरांगे यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर राणेंनी यांनी देखील जरांगेंवर टीका केली.
गडकरींची उमेदवारी पक्की, दुसऱ्या यादीत येणार नाव; तिकीट कापल्याच्या चर्चांना फडणवीसांचा फुलस्टॉप!
नारायण राणे यांच्या भूमिकेमुळे मराठा आंदोलनात मागणीत फूट पडत असा आरोप मराठा आंदोलकांनी केला होता. ज्यांना ओबीसीमधून आरक्षणाचा लाभ घ्यायचा तो मराठा समाज घेईल पण राणेंनी शांत राहावं अशी समाजाची मागणी होती. त्यामुळे राणेंवर मराठा समाजाचा अधिक रोष असल्याचे दिसून येत आहे.
महिला दिनी सुधा मूर्ती यांचा सन्मान : राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर नियुक्ती
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला नगर जिल्ह्यातून देखील मोठा पाठिंबा मिळत आहे. आज नारायण राणे हे नगरच्या दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर नगर शहरातील सकल मराठा समाजने नारायण राणेंना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता. त्यापूर्वीच कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहे. त्यांना तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.