Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापत असल्याचं पाहायला मिळतं आहे. राज्यातील विविध ठिकाणी आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा तरुण जीवन संपवत आहेत. अशातच आता अहमदनगरमधील नेवासा तालुक्यातही मराठा तरुणाने जीवन संपवल्याचं समोर आलं आहे. खरवंडी गावातील दत्तात्रय अभिमन्यू भोगे या तरुणाने साठवण बंधाऱ्यात उडी घेत जीवन संपवलं आहे.
Maratha Reservation : बीडमध्ये आमदारांचं निवासस्थान पेटवलं; अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू!
मराठा आरक्षणासाठी समाज बांधव आता हळूहळू आक्रमक होऊ लागला आहे. यातच आरक्षणाचे पडसाद आता नगर जिल्ह्यात देखील उमटू लागले आहे. नुकतेच मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी एकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. नगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यात घडली आहे. या घटनेनं तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आरक्षणासाठी राज्यात अनेक ठिकाणी आत्महत्या सुरु असून नगर जिल्ह्यात देखील आता मराठा समाज बांधव टोकाचे पाऊल उचलू लागले आहेत.
Maratha Reservation : चाळीस दिवस सरकारने काय केलं? अशोक चव्हाणांचा खोचक सवाल
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरु केले आहे. या आमरण उपोषणाचा आजचा सातवा दिवस असताना राज्यातल्या तरुणांकडून या पार्श्वभूमीवर उपोषण करण्यात येत आहे. जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरात अनेक ठिकाणी उपोषणं होत आहेत. अनेक तरुण आत्महत्या करत आहेत.
मराठा समाजाला दोन टप्प्यात आरक्षण देणार! मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला सरकारचा प्लॅन
मराठा समाजाला आरक्षण मिळावे व उपोषणाला आपला पाठिंबा देण्यासाठी अनेक ठिकाणी समाज बांधव आता आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलू लागले आहे. यातच नेवासे तालुक्यातल्या खरवंडी गावात असलेल्या दत्तात्रय अभिमन्यू भोगे या तरुणानं खरवंडी गावातल्या साठवण बंधाऱ्यात आत्महत्या करत जीवन संपवलं. आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत त्यानं आत्महत्याचं कारण सांगितलं आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आत्महत्या करत असल्याचे त्या चिठ्ठीत म्हटलं आहे. दरम्यान राज्यात आरक्षणासाठी आत्महत्या करण्यात येऊ लागल्या आहेत तर याचेच पडसाद जिल्ह्यात पडू लागले आहे. असं असले तरी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच नेतेमंडळी केवळ उपोषणानं पाठिंबा देत आहे मात्र यावर ठोस असा काही निर्णय होत नाही यामुळे येत्या काळात हे उपोषण आणखी चिघळणार असे चित्र दिसत आहे.