Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सकल मराठा समाज दिवसेंदिवस आक्रमक होऊ लागला आहे. यातच अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडत आहेत. यामुळे आता प्रशासन देखील सावधगिरीची भूमिका घेत आहे. आंदोलकांकडून महामंडळाच्या बसेस टार्गेट केल्या जात. असल्याच्या घटनांमुळे नगर जिल्ह्यातील लालपरीची अर्थात राज्य महामंडळाच्या बसेसला आता ठिकठिकाणी ब्रेक लागतो आहे. खबरदारीची भूमिका म्ह्णून अनेक ठिकाणी बस या आगारातच उभ्या आहेत. दरम्यान जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
Sanjay Raut : ‘मुख्यमंत्री अपयशी, त्यांनी राजीनामा द्यावा’; राऊतांनी केली मागणी
राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरु झाले असून त्याचेच पडसाद आता नगर जिल्ह्यात देखील उमटू लागले आहे. जिल्ह्यातील अनेक गावपातळीवर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करण्यात येत आहे. असे असतांना काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे सुद्धा दिसत आहे. सोमवारी कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे रस्त्यावर टायर जाळण्यात आले आहे. तसेच राज्यात अनेक ठिकाणी लोकांनी एसटी बस थांबवून पेटवून दिल्याची देखील घटना घडलीय. आता याच पार्श्वभूमीवर आता नगर आगाराने देखील सावधगिरीची भूमिका घेतली आहे.
Bigg Boss 17 च्या घरात सुशांत सिंग राजपुतसोबतच्या नात्याबद्दल अंकिताने सोडलं मौन, म्हणाली…
नगर शहरातील परिस्थिती काय?
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा फटका लालपरीला बसतो असल्याचे चित्र सध्या राज्यात दिसत आहे. यातच अनेक ठिकाणी एसटीच्या फेऱ्या रद्द केल्या जात असल्याचे देखील दिसत आहे. दरम्यान लालपरीला ब्रेक लागल्याने त्याचा परिणाम म्हणजे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. नगर शहरातील पुणे बसस्थानकावर सकाळपासून बसेस या बंद असल्याचे दिसून येत आहे. तसेच बाहेरून देखील बस स्थानकावर येत नाही असे चित्र आहे. तर माळीवाडा बसस्थानक येथे काही प्रमाणात बस सुरु असून मात्र ग्रामीण भागातून तसेच इतर जिल्ह्यातून येणाऱ्या बसेसचे प्रमाण कमी झाले आहे.
मराठा समाज आक्रमक
मराठा आरक्षण आंदोलनाची ज्योत आता चांगलीच पेटली आहे. महिनाभरात आरक्षण देऊ असे आश्वासन दिल्यानंतर त्याची पूर्तता न झाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरु केले आहे. राज्यात आगामी काळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत. मात्र मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असल्याने गावोगावचे सर्वच पक्षांतील मराठा समाजाचे कार्यकर्ते दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसत आहेत. आरक्षणासाठी वेगवेळ्या स्वरूपाची आंदोलने करणारे कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरू लागले आहे.