Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आंतरवाली सराटी गावात उपोषण केलं. सरकारने आश्वासन दिल्यानंतर 40 दिवसांचा वेळ देत त्यांनी उपोषण स्थगित केलं. त्यानंतर आता जरांगे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. काल ते नाशिकमध्ये होते. येथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर भाषणात त्यांनी सरकारला काही टोचणारे सवाल केले.
आमचं आंदोलन शांततेच्या मार्गानं सुरू होतं मात्र, आमच्यावर लाठी हल्ला करण्यात आला. तो का करण्यात आला, याचं उत्तर सरकारनं अजूनही दिलेलं नाही. चार महिन्यांचं बाळ असलेल्या आईचं डोकं फुटलं. त्या आईचं रक्त बाळाच्या अंगावर पडलं. काहींचे हात मोडले, पाय मोडल हा सगळा हल्ला आमच्यावर नव्हता. तर तो संपूर्ण मराठा समाजावर होता. आमचं काय चुकलं की असा प्राणघातक हल्ला केला गेला असा सवाल जरांगे यांनी सरकारला विचारला. शांततेत सुरू असलेल्या आंदोलनावर लाठीहल्ला का केला असा सवाल करत मराठा आरक्षणाला विरोध दर्शवणाऱ्यांना मग ते कुणीही असोत त्यांना सोडणार नाही असा इशारा जरांगे यांनी दिला.
Nanded Market Committee Election: भाजपला मोठा धक्का; 5 बाजार समितीमध्ये ‘मविआ’चा विजय
मला काही खुर्चीचा मोह नव्हता. मी शांत बसा म्हटले की लोक शांत व्हायचे. इतकं सगळं असताना आम्ही असा काय धिंगाणा केला. मराठ्यांची औलाद कधीच धिंगाण करू शकत नाही. तरी देखील सरकारने कधीच खुलासा केला नाही, असे जरांगे म्हणाले.
मराठा समाजाला संपूर्ण राज्यात सरसकट ओबीसी आरक्षण मिळावे, यात सरकारने पुन्हा चालढकल केल्यास त्याचे वाईट पऱिणाम होतील,असा इशारा त्यांनी दिला. मराठा आरक्षण आंदोलन निर्णायक टप्प्यावर पोहोचले असताना मराठा समाजाने एक इंचही मागे हटू नये. सरकारमध्ये बसलेल्या नेत्यांकडून मराठा समाजातील नेत्यांमध्ये फूट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीतीही जरांगेंनी याआधी व्यक्त केली होती.
भुजबळांनी आम्हाला डिवचू नये, मराठा समाज पेटला तर…; मनोज जरांगे-पाटलांचा इशारा