Download App

‘चुलीत गेला पक्ष मराठा आरक्षणच आमचं लक्ष्य’; जरांगेंच्या समर्थनात ‘मराठा’ मैदानात

Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. यातच मनोज जरांगे यांच्या सभा सुरु असून ते ठिकठिकाणी सरकारला चांगेलच धारेवर धरत आहे. यामुळे आता मराठा समाज बांधव देखील आरक्षणासाठी चांगलाच आक्रमक झाला आहे. जोपर्यंत राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही, तोपर्यंत आमदार, खासदारासह कोणत्याही राजकीय नेत्याला गावात प्रवेश करू दिला जाणार नाही. पुढाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळणे अडचणीचे ठरत आहे, त्यामुळे आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याही नेत्याला गावात प्रवेश दिला जाणार नाही, अशा स्वरूपाचा फ्लेक्स शेवगाव तालुक्यातील भविनिमगाव येथे झळकले आहे.

“आता सेना-भाजप युती नाही” : नितीन गडकरींची सार्वजनिक व्यासपीठावर जाहीर कबुली; भाजप-सेना नेत्यांना जोरदार चपराक

गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा मराठा आऱक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. अनेक ठिकाणी या प्रशांवरून राजकीय नेत्यांची चांगलीच कोंडी झाल्याचे देखील पाहायला मिळत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेला मराठा समाज आता लोकप्रतिनिधींना गावात प्रवेशबंदी घालत आहे, असाच काहीसा प्रकार आता नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात घडला आहे.

नगरमध्ये मराठा आरक्षणासाठी राजकीय नेत्यांना गावबंदी, मराठा समाजाची आक्रमक भूमिका

शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव, मठाचीवाडी, मजले शहर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने गावाच्या चौकात सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली. याचा फलक गावाच्या वेशीवर लावण्यात आला.

Mahua Moitra यांचं लोकसभा सदस्यत्व धोक्यात? जाणून घ्या आतापर्यंतचा घटनाक्रम

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सर्व पक्षाच्या नेत्यांना गावात येऊ देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. ‘चुलीत गेले नेते, चुलीत गेला पक्ष; मराठा आरक्षण हेच आमच लक्ष्य’असा मजकूर फलकावर आहे.

मधोमध पलंग, नवदाम्पत्यानं पकडापकडी खेळायची का?; शहर नियोजनावरुन राज ठाकरेंचा संताप

पाथर्डीतही झळकले फ्लेक्स :
मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण तसेच इतर अनेक समाजाचा आरक्षणाचा लढा सुरू आहे. या आरक्षणाच्या लढाईमुळे अनेक राजकीय नेत्यांची चांगलीच कुचंबणा झाली आहे. अनेक ठिकाणी राजकोय नेत्यांना विविध समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत असुन, काही ठिकाणी राजकीय नेत्यांसह आमदार, खासदारांना गावबंदी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पाथडी तालुक्‍यातील मिरी,या गावातही आता सकल मराठा समाजाच्या वतीने फ्लेक्स लावून नेते मंडळींना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे.

Tags

follow us