Download App

Maratha Reservation : …तोपर्यंत जरांगेंनी जरा सबुरी ठेवावी; मंत्री राधाकृष्ण विखेंचा सल्ला

Maratha Reservation : दुसरीकडे राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणासाठी देण्यासााठी 24 डिसेंबरची मुदत दिली आहे. त्यावर सरकारकडून विविध मंत्री आणि नेते मनोज जरांगे यांना विविध सल्ले देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये आता महसूल मंत्री आणि अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील जरांगे यांना एक सल्ला दिला आहे. ते आज अहमदनगरमध्ये बोलत होते.

विखे पाटलांचा जरांगेंना सबुरीचा सल्ला…

आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यात रान पेटलेलं आहे. त्यात आरक्षणासाठी कंबर कसलेले मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले आहे. तर दुसरीकडे सरकारने आरक्षणासाठी मुदत मागितली आहे. तोपर्यंत आरक्षणाबाबत काहीतरी तोडगा काढला जाईल. मात्र तोपर्यंत जरांगे पाटलांनी जरा सबुरी ठेवावी. असा सल्ला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.

Prajakta Mali : नववधू प्रिया मी बावरते… प्राजक्ताचा नवा लूक; चाहते घायाळ!

पुढे ते म्हणाले की, आरक्षणाच्या मुदतीबाबत जरांगे पाटील 24 डिसेंबर म्हणतात. तर सरकार 2 जानेवारी म्हणत आहे. मात्र यामध्ये फारसं अंतर नाही. सात-आठ दिवसाचा फरक आहे. मात्र सरकार यासंबंधी संवेदनशील आहे. त्यामुळे जरांगे पाटलांनी वेळ दिला पाहिजे. असं विखे पाटलांनी म्हटलं आहे. मंत्री विखे आज अहमदनगर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली.

नारायण राणेंनंतर नितेश राणेंनीही काढला जरांगेचा अभ्यास…

भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane ) यांनी देखील नारायण राणे यांच्याप्रमाणेच जरांगे यांच्या अभ्यास कमी आहे. असं म्हटलं आहे. मात्र यावेळी त्यांनी जरांगे यांना राष्ट्रवादीचे एक पदाधिकारी पाठिंबा देत आहेत. त्यांना सरकार विरूद्ध भडकवत असल्याचं म्हटलं आहे. नितेश राणे हे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते त्यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

Lok Sabha : बारामतीसाठी अजितदादांपाठोपाठ भाजपनंही टाकला डाव; खास व्यक्तीसाठी लावणार ताकद

पत्रकारांनी राणेंना जरांगेच्या अटकेवर प्रश्न विचारला तेव्हा राणे म्हणाले की, जसं नारायण राणे म्हणाले की, जरांगे हे तरूण आहेत. त्यांचा अभ्यास कमी आहे. त्यांना जे काही राजरकीय पदाधिकारी त्यांच्या अवती-भोवती आहेत. जे त्यांना भाषण लिहून देत आहेत. त्यांच्या सभेचं नियोजन करत आहेत. ज्या प्रमाणे बीडच्या जाळपोळीमध्ये एक जण पडकला गेला. त्याच प्रमाणे छत्रपती संभाजी नगरमध्ये एक प्रदिप साळुंके म्हणून आहेत. ते राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत. त्यांनी शिक्षक मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून तिकीट मागितलं होतं. त्यामुळे जरांगे यांच्या सभा आणि प्रदिप साळुंखे यांचं कनेक्शन समोर आणावं लागेल.

follow us