Maratha Reservation : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावामध्ये सुरू असलेल्या मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) आंदोलनाला काही दिवसांपूर्वी हिंसक वळण लागलं होतं. त्यावेळी 1 सप्टेंबरला पोलिसांनी या आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याने हे आंदोलन चिघळलं होतं. त्यानंतर आता या आरक्षणासाठी आणखी एक बळी गेला आहे. धुळे जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठीच्या उपोषणामध्ये भाषण करून घरी परत आल्यानंतर मराठा समन्वयकाचा मृत्यू झाला आहे.
Maratha Reservation साठी सकल मराठा समाजाकडून मुख्यंमंत्र्यांच्या ठाण्यात बंदची हाक; भाजपचाही पाठिंबा
भाषण करून घरी येताच मृत्यू…
धुळे जिल्ह्यामध्ये आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मराठा समन्वयकाला भाषण करून घरी येताचं ह्रदयविकाराचा झटका आला. त्यात त्याचा मृत्यू झाला. राजाराम पाटील असं त्याचं नाव आहे. शहरातील जेल रोडवर गेल्या चार दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उपोषण सुरू होते. त्यात त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने ते घरी आले. त्यानंतर घरी येताचं ह्रदयविकाराचा झटका आला. त्यात त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर मराठा समाजाकडून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पाटील यांना आंदोलनाच्या त्रासामुळेच ह्रदयविकाराचा झटका आल्याचे म्हटले जात आहे. या घटनेमुळे धुळे जिल्ह्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यात जालन्यात मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे यांनी देखील आपलं उपोषण आणखी तीव्र केलं आहे.
दरम्यान धाराशिवमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी एका ३० वर्षीय युवकाने तलावात उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. किसन चंद्रकांत माने (30) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी आरोळी ठोकत गाव तलावात उडी टाकून त्याने आत्महत्या केली. ही घटना धाराशिवा जिल्ह्यातील माडज येथे घडली.