Download App

‘शिर्डीतून मताधिक्क्याने निवडून येणार’; रामदास आठवलेंनी व्यक्त केला विश्वास

Ramdas Athavle : आगामी लोकसभा निवडणुका उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. अशातच देशातील सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. अशातच आता महायुतीतील घटक पक्ष आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavle) यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्क्याने निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

राम शिंदे अन् देवेंद्र फडणवीसांमध्ये बिनसलं? राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण

पुढे बोलताना ते म्हणाले, लोकसभेत रिपब्लिकन पक्षाला दोन जागा मिळायला पाहिजेत. 2009 मध्ये शिर्डी मतदार संघातून मी पराभूत झालो, परंतु या वेळेस चांगल्या मताधिक्याने जिंकेल. 2024 मध्ये भाजप 400 पेक्षा अधिक जागा जिंकणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेत्तृत्वाखाली देश पुढे जात असल्याचं रामदास आठवले म्हणाले आहेत.

मनमाडच्या संपावर मोठा निर्णय! राज्यात पेट्रोल-डिझेल पुरवठा सुरु, 24 तासात पुरवठा…

तसेच लोकांना न्याय देण्याचे काम मोदी सरकारने केले असून केंद्राच्या विविध योजना आज सर्वसामान्य जनतेपर्यंत खेडोपाडी पोहचल्या आहेत. त्यामुळेच 2024 च्या लोकसभेत भाजप 400 पेक्षा अधिका जागा जिंकेल, असाही विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. 2024 च्या निवडणुकीत आम्हाला कुठलीही अडचणी येणार नाही.

Steve Waugh : ..तर मी क्रिकेटच खेळलो नसतो; दक्षिण आफ्रिकेच्या ‘त्या’ निर्णयावर स्टीव्ह वॉ भडकला

इंडिया आघाडीने आम्हाला किती हरवण्याचे प्रयत्न केले तरी आमचाच विजय होईल. इंडिया आघाडीला आम्हाला हरवण्याचा अधिकार असला तरी सुद्धा मतदार जनता त्यांच्या बाजूने गेली तरच आम्ही हरवू शकतात मात्र मतदार जनता आमच्या सोबत असल्यामुळे आमचा हरण्याचा प्रश्नच येत नाही, असा आत्मविश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

Happy Election Year : जगभरात धुमशान! या वर्षात तब्बल 78 देशांमध्ये निवडणुकांचे वारे

लोकसभा जागावाटपावरुन सर्वच राजकीय पक्षांनी चाचपणी करायला सुरुवात केली आहे. त्यातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या पक्षाला दोन जागा मिळाव्यात असं पुन्हा एकदा जाहीरपणे सांगितलं आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघासह आणखी एक विदर्भातील एखादी जागा द्यावी अशी मागणी यावेळी केली आहे. त्यामुळे शिर्डी मतदारसंघात विद्यमान खासदार शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे यांची गोची होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, रामदास आठवले शिर्डीच्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम असून अद्याप महायुतीकडून या जागेबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे आगामी काळात महायुतीकडून रामदास आठवले यांना शिर्डी लोकसभेची जागा मिळणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

follow us