कोळपेवाडी – देशातील दिल्ली आणि मुंबई ही दोन महानगरे नेहमीच चर्चेत असतात. त्याप्रमाणेच या दोन महानगरांमधील विमान प्रवास देखील नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. असाच दिल्ली-मुंबई विमान प्रवास आ.आशुतोष काळे (Ashutosh Kale) आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale ) यांनी केला असून या विमान प्रवासात रामदास आठवले यांच्यासमवेत झालेल्या गप्पांमधून मोलाचे मार्गदर्शन मिळाले असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.
CM देवेंद्र फडणवीस कामाला लागले! पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर
कोपरगाव मतदार संघातील सावळीविहीर-कोपरगाव (एन.एच.७५२जी) या राष्ट्रीय महामार्गाचे धीम्या गतीने सुरु असलेल्या कामाचे गाऱ्हाणे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मांडण्यासाठी आ.आशुतोष काळे दिल्लीला गेले होते. नितीन गडकरी यांची भेट घेवून बुधवार (दि.०४) रोजी पुन्हा मुंबईला येण्यासाठी विमान प्रवासात त्यांची केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांच्याशी भेट झाली. या भेटीत आठवले आणि आमदार काळे यांच्यात सामाजिक, राजकीय विषयांसह विविध विषयांवर चर्चा झाली.
सरकारच्या चांगल्या उपक्रमांना माझा पाठिंबा, पण चुकलात तर…; राज ठाकरेंचा फडणवीस सरकारला इशारा
केंद्र सरकार नेहमीच समाजातील तळागाळातील लोकांसाठी काम करत आहे. शोषित, वंचित आणि मागासलेल्या वर्गासाठी अनेक कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी केली जात असल्याचे सांगत रामदास आठवले यांनी विविध विषयांवर दिलखुलासपणे आ. आशुतोष काळे यांच्या समवेत चर्चा केली.
केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांच्या समवेत केलेला दिल्ली-मुंबई विमान प्रवास हा माझ्यासाठी भौतिकदृष्ट्या एक साधा प्रवास नसून, तो राजकीय, सामाजिक आणि मानसिक दृष्ट्या अनेक गोष्टींबाबत माझ्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावणारा ठरला आहे. हा प्रवास माझ्यासाठी केवळ दिल्ली ते मुंबईच्या दुरचे अंतर पार करण्याचा नवा अनुभव नव्हता, तर तो समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्याची एक अनमोल संधी असल्याचे आ. आशुतोष काळेंनी केंद्रीय मंत्री आठवले यांच्या समवेत केलेल्या दिल्ली मुंबई विमान प्रवासाबाबत सांगितले आहे.