Ram Shinde : खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी मागील पाच वर्षात जिल्ह्याच्या विकासात कोणतीही कसर सोडली नाही, त्यामुळे विखेंना मताधिक्क्याने निवडून द्या, अशी साद भाजपचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी जनतेला घातली आहे. दरम्यान, महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ आज जामखेडमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेदरम्यान, राम शिंदे बोलत होते. यावेळी बोलताना राम शिंदे यांनी विखेंनी केलेल्या विकासकामांचा लेखाजोखाच मांडला आहे.
भ्रष्टाचाराचं आरोप अन् घरावर आयटी रेड कोण आहेत अरविंद सावंतांना फाईट देणाऱ्या यामिनी जाधव?
राम शिंदे म्हणाले, सुजय विखे यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी कोणतीही कसर सोडली नाही. त्यांनी केंद्रासह राज्याच्या विविध योजना जिल्ह्यातील प्रत्येक गावात पोहोचवल्या आहेत. विखेंच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. सोबतच जिल्ह्याच्या दळणवळणाच्या सेवा सुविधा वाढवण्यावरही त्यांनी भर दिला आहे. महिलांसाठी बचत गटांच्या माध्यमातून स्वयंरोजगार देण्याचं काम केलं आहे. सर्वाधिक निधी सुजय विखेंनी जिल्ह्यासाठी आणलायं, त्यामुळे पुढील काळात ते जिल्ह्याच्या विकासासाठी चांगल काम करणार असून विखेंना मोठ्या मताधिक्क्याने निवडून देणे गरजेचं असल्याची साद राम शिंदे यांनी घातली आहे.
फडणवीससाहेब, फुंकर मारून यांचा वाडा उद्धवस्त करा; सदाभाऊ खोतांचा मोहिते पाटलांवर निशाणा
मोदींच्या तिसऱ्या पर्वाचा हिस्सा व्हायचंय…
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे व्यक्तिमत्व, कार्यशैली निर्णयक्षमता, दूरदृष्टी,विकासाचा ध्यास आणि देशाप्रती असलेली कळकळ देशाने पाहिली आहे. यामुळे तिसऱ्यांदा त्यांना पंतप्रधान पदाची धुरा सांभाळण्याची संधी जनतेकडून दिली जाणार आहे. मोदींची तिसऱ्या पर्वाकडे दमदार वाटचाल सुरू आहे. त्याचा आपल्याला हिस्सा व्हायचा असल्याचं सुजय विखेंनी स्पष्ट केलं आहे.
तितका खर्च आम्ही फक्त 1 वर्षात करतो, मोदींचा पुण्यातून काँग्रेसवर हल्लाबोल
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतमातेची सेवा करण्याचे दायित्व खांद्यावर घेतले आहे. आपली भारतामाता मोदींच्या भक्तीयोगातून, कर्मयोगातून, आणि ज्ञानयोगातून पुन्हा एकदा विश्वरूपदावर आरूढ झाल्या शिवाय राहणार नाही असा विश्वास सुजय विखे यांनी व्यक्त केला आहे. यामुळे तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी कामाला लागा, असंही ते म्हणाले आहेत.
जामखेडमधील मुंगेवाडी येथे मंगळवारी महायुतीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. राम शिंदे, रवी सुर्वसे, बाळासाहेब भोसले, योगेश सुर्वसे, राजू भोसले, अण्णा सुर्वसे यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.