पाच वर्षांचे प्रश्न, अडचणी अन् दुःखावर फडणवीसांची फुंकर… राम शिंदे अन् विखे पाटलांची अखेर ‘दिलजमाई’
अहमदनगर : पाच वर्षांपासूनचे प्रश्न, अडचणी अन् दुःख देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) यांना सांगितले, त्यावर त्यांच्याशी तपशीलवार आणि सविस्तर चर्चा झाली. आता पक्षीय पातळीवरचे आमच्यातील वाद संपुष्टात आलेले आहेत. वैयक्तिक मतभेद असले तरी ते निवडणुकीमध्ये काढायचे नसतात. कारण मी भारतीय जनता पक्षाचा गेल्या 30 वर्षांपासूनचा निष्ठावांत घरंदाज आणि खानदानी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, असे म्हणत भाजपचे (BJP) नेते राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे (Sujay Vikhe Patil) पाटील यांच्यासोबतचे आपले वाद मिटले असल्याचे भाजप आमदार राम शिंदे ( Ram Shinde) यांनी जाहीर केले.
काल (24 मार्च) मध्यरात्री उशीरा फडणवीस यांची राम शिंदे आणि विखे पिता-पुत्रांसोबत बैठक पार पडली. यानंतर राम शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना परस्परांमधील वाद संपुष्टात आल्याचे सांगितले. (Devendra Fadnavis met with Ram Shinde and Radhakrishna Vikhe Patil, Sujay Vikhe Patil late at midnight.)
राम शिंदे म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि मी अशी एक बैठक आयोजित केली होती. गेल्या अनेक वर्षापासून जे काही विषय होते, त्या अनुषंगाने सविस्तर आणि तपशीलवार अशी चर्चा झाली. शेवटी पक्षाने, नेतृत्वाने जो तिकीटाबाबत निर्णय घेतला, त्या निर्णयाचा प्रमुख दावेदार असूनही मी स्वीकार केला आहे. त्यांना शुभेच्छाही दिल्या. पण माझ्या मनामध्ये जे काही प्रश्न होते, अडचणी होत्या, त्या मी नेतृत्वाला सांगितल्या. या बैठकीत जवळपास त्या सगळ्या अडचणींचे आणि प्रश्नाचे निकारण झालेले आहे.
वायनाडमध्ये राहुल गांधींच्या विरोधात भाजपचा डाव : कोण आहेत के. सुरेंद्रन?
देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भामध्ये यशस्वी मध्यस्थी केली असे म्हणावे लागेल. कारण शेवटी दुःख अडचणी आणि प्रश्न याला वाट मोकळी करून देताना कुणीतरी आपला ऐकले पाहिजे, कुणीतरी दुःख समजावून घेतले पाहिजे आणि त्या दुःखावरती नीट नेमकं, चांगलं जर आपल्याला सहकारी आणि मदतीची भावना करत असेल, तर नेतृत्वाचा आदेश हा मान्य केला पाहिजे. निवडणुकीला आता फार काळ राहिलेला नाही. या निवडणुकीत अहमदनगरमध्ये भाजपचा खासदार झाला पाहिजे, त्या अनुषंगाने आजची बैठक यशस्वी झाली आहे, असे राम शिंदे यांनी सांगितले आहे.
BJP Candidate List : अभिनेत्री कंगना रणौत हिची अखेर राजकारणात एंट्री, भाजपने दिली लोकसभेची उमेदवारी
पक्षीय पातळीवरचे वाद संपुष्टात आले आहेत. वैयक्तिक मतभेद असले तरी ते निवडणुकीमध्ये काढायचे नसतात, या मताचा मी आहे. कारण मी भाजपचा 30 वर्षापासूनचा निष्ठावंत, घरंदाज आणि खानदानी कार्यकर्ता राहिलेलो आहे. लोकशाहीचे युद्ध म्हणजे निवडणूक असते. या निवडणुकीच्या कालखंडामध्ये एका ठराविक सीमारेषेपर्यंतच हे वाद, मतभेद असले पाहिजे असा मानणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्षाने दिलेला आदेश मानून आपकी बार 400 पार हा नारा पूर्ण करण्यासाठी आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनविण्यासाठी अहमदनगरचा खासदार हा भाजपचाच निवडून आला पाहिजे ही भूमिका माझी झालेली आहे. या भूमिकेशी एकरूप आणि सहमत होऊन बैठक संपुष्टात आलेली आहे, अशीही भावना शिंदे यांनी व्यक्त केली.