वायनाडमध्ये राहुल गांधींच्या विरोधात भाजपचा डाव : कोण आहेत के. सुरेंद्रन?

वायनाडमध्ये राहुल गांधींच्या विरोधात भाजपचा डाव : कोण आहेत के. सुरेंद्रन?

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2024 साठी केंद्रातील सत्ताधारी भाजपने (BJP) उमेदवारांची पाचवी यादीही जाहीर केली आहे. यात उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, कर्नाटक, हिमाचल प्रदेश या राज्यांसह केरळमधील (Keral) उमेदवारांच्या नावाचाही समावेश आहे. यातच भाजपने केरळमधील वायनाडमधून काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविरोधात के. सुरेंद्रन यांना मैदानात उतरवले आहे. सुरेंद्रन यांच्या रुपाने वायनाडमध्ये गांधी यांना कडवे आव्हान मिळणार असल्याची चर्चा आहे. (Bharatiya Janata Party has been nominated k. Surendran from Wayanad constituency against Congress leader Rahul Gandhi)

BJP Candidate List : अभिनेत्री कंगना रणौत हिची अखेर राजकारणात एंट्री, भाजपने दिली लोकसभेची उमेदवारी

के. सुरेंद्रन हे मागील अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहेत. सध्या ते केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी शाखा असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) मधून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात के. सुरेंद्रन यांनी उत्तर मलबार जिल्हा सहकारी व्यापार संस्थेचे संचालक, दिसा सेवा संस्कार केंद्राचे अध्यक्ष, राष्ट्रीय युवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाचे संस्थापक आणि नेहरू युवा केंद्राचे सल्लागार मंडळावर काम केले आहे.

शिवतारे पुरंदरच्या भूमीत जन्माला आलेला दिलेर खान, त्यांचा राजकीय अंत जवळ; मिटकरींचा पलटवार

2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांनी त्यांच्या उत्तर प्रदेशमधील अमेठी या पारंपारित मतदारसंघातून अर्ज भरला होता. याशिवाय केरळमधील वायनाड मतदारसंघातून ते मैदानात उतरले होते. त्यावेळी अमेठीमधून भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला होता. मात्र वायनाडमधून ते विक्रमी मतांनी निवडून आले होते. वायनाडमधून पहिल्यांदाच निवडणूक लढवताना राहुल गांधी यांनी चार लाख 29 हजार 161 मताधिक्यांनी विजय मिळवला होता. आता यावेळी त्यांनी केवळ वायनाडमधूनच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. अशात के. सुरेंद्रन यांना मैदानात उतरवून भाजपने मोठा डाव खेळल्याची चर्चा आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube