Download App

‘मी स्पष्ट बोलणारा…कोणाला दुखावण्याचा माझा हेतू नाही’; मंचावरूनच खासदार विखेंचा माफीनामा

Ahmednagar Loksabha : लोकसभा निवडणुकीसाठी (Ahmednagar Loksabha) भाजपकडून नगर दक्षिणेसाठी सुजय विखे (Sujay Vikhe) यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली. त्या अनुषंगाने भाजपची (BJP) आढावा बैठक देखील आज पार पडली. मात्र, या बैठकीमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना सुजय विखे यांनी मंचावरूनच जाहीर माफी देखील मागितली आहे.

इंडिया आघाडीच्या सभेला अखिलेश यादवांची दांडी, निवेदन जारी सांगितलं अनुपस्थित राहण्याचं कारण

लोकसभेची यादी जाहीर होतात येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपची नगर शहर ात आढावा बैठक पार पडली आहे. लोकसभेची रणनीती काय असणार यावरती करण्यात आली. यावेळी भाजपाचे उमेदवार सुजय विखे तसेच आमदार बबनराव पाचपुते आमदार मोनिका राजळे आमदार राम शिंदे तसेच माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह अनेक कार्यकर्ते तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार सुजय विखे म्हणाले की पक्षाने दुसऱ्यांदा मला काम करण्याची संधी दिली याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. भारतीय जनता पार्टी पक्षांमध्ये उमेदवारी मिळत असताना अनेक नेते आहेत त्यांचे पक्षासाठी मोठं योगदान आहे. असे लोकप्रतिनिधी होते ज्यांनी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली मी या सगळ्या लोकप्रतिनिधींचे आभार व्यक्त करतो पक्षाच्या निर्णयाला आपण मनाचे मोठेपणा दाखवत स्वीकारलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना परत एकदा प्रधानमंत्री करण्यासाठी सगळेजण एक दिलाने कामाला लागलेले आहेत असा संदेश या बैठकीतून दिला आहे.

उच्च न्यायालयाचा सरकारला धक्का, ८ हजार कोटींची आपत्कालिन रूग्णसेवेची निविदा रद्द

हा पाच वर्षांचा प्रवास फार खडतर राहिलेला आहे. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर अनेक लोकांनी कामांची मागणी केली असेल कारण कार्यकर्त्यांची इच्छा असते सरकार आले की आपले काम होतील सगळ्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून सगळ्यांचा समाधान करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पण या पाच वर्षाच्या कार्यकाळात काही कार्यकर्ते, पदाधिकारी नेते दुखावले गेले असतील तर मी या बैठकीच्या माध्यमातून या सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची माफी मागतो.

कधीकाळी मजूर असणारा ‘लॉटरी किंग’ Electoral Bond खरेदीत अव्वल…नेमका आहे तरी कोण?

तसेच पुढे बोलताना विखे म्हणाले, काम करत असताना कोणताही उद्देश कोणाला दुखावण्याचा नसतो. प्रत्येक व्यक्तीचे काम करण्याची पद्धत वेगळी असते. माझा स्वभाव स्पष्ट बोलण्याचा आहे. त्यामुळे काही लोकांना तो स्वभाव पटतो काही कार्यकर्त्यांना तो पटत नाही पण मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्या या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनावधानाने दुखावला गेला असेल मी माझ्या परिवाराची तसेच आई-वडिलांचं मुलांना स्मरून सांगतो माझा असा कोणताही हेतू नव्हता कोणी दुखावला गेला पाहिजे.

गेल्या पाच वर्षाच्या कार्य काळामध्ये असंख्य अडचणीचा सामना करत मात्र समन्वयाची भूमिका ठेवत आम्ही काम सुरू. समन्वय झाला काही ठिकाणी समन्वय होतो आहे आज उमेदवार कोणीही असला तरी सर्व कार्यकर्त्यांचं स्वप्न एकच आहे 24 ला देखील नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवायचं.

follow us