कधीकाळी मजूर असणारा ‘लॉटरी किंग’ Electoral Bond खरेदीत अव्वल…नेमका आहे तरी कोण?
Santiago Martin : सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर अखेर भारतीय स्टेट बॅंक ऑफ इंडियाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे इलेक्टोरेल बॉंडसंदर्भातील (Electroal Bonds) माहिती सादर केली आहे. निवडणूक आयोगाकडू ही माहिती आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. या माहितीनूसार सर्वाधिक इलेक्टोरे बॉंड खरेदी करणाऱ्या कंपन्यांची नावे समोर आली आहेत. फ्युचर गेमिंग (Future Gaming) कंपनीने सर्वाधिक 1368 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बॉंड खरेदी केलेले आहेत. या कंपनीचे मालक दक्षिण भारतातील लॉटरी किंग सँटियागो मार्टिन (Santiago Martin) आहेत. सॅंटियागो मार्टिन आहेत तरी कोण? त्यांच्याविषयी जाणून घेऊयात…
AAP Candidate List : मंत्रीच निवडणुकीच्या रिंगणात; ‘पंजाब’साठी आपकडून 8 उमेदवारांची यादी जाहीर
कोण आहेत सॅंटियागो मार्टिन?
सँटियागो मार्टिनच्या यांनी म्यानमारच्या यांगूनमध्ये मजूर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. 1988 मध्ये ते भारतात परतले आणि त्यांनी तामिळनाडूमध्ये लॉटरी व्यवसाय सुरू केला. ईशान्येकडे जाण्यापूर्वी त्यांनी नंतर कर्नाटक आणि केरळमध्ये व्यवसायाचा विस्तार केला. ईशान्येत त्यांनी लॉटरी व्यवसाय सुरू केला. नंतर त्यांनी भूतान आणि नेपाळमध्येही व्यवसायाच्या शाखा सुरु केल्या.
लॉटरीच्या व्यवसायात यश मिळाल्यानंतर त्यांनी बांधकाम, रिअल इस्टेट, कापड यांसह इतर व्यवसायांमध्येही यश मिळवलं. ते ऑल इंडिया फेडरेशन ऑफ लॉटरी ट्रेड अँड अलाईड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष देखील आहेत. फ्यूचर गेमिंग सोल्यूशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड असं त्यांच्या संस्थेचं नाव असून जागतिक लॉटरी असोसिएशनचे आणि ऑनलाइन गेमिंग आणि कॅसिनो आणि स्पोर्ट्स बेटिंगच्या क्षेत्रात या कंपनीचा विस्तार झालेला आहे.
फ्यूचर गेमिंग आणि हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडने 2019 ते 2024 दरम्यान ₹1368 कोटी देणगी दिली आहे. ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालय 2019 पासून पीएमएलए कायद्याच्या कथित उल्लंघनासाठी कंपनीची चौकशी करत आहे. ईडीने या कंपनीवर मे 2023 मध्ये कोईम्बतूर आणि चेन्नई येथे छापे टाकले होते.
इलेक्टोरल बॉंड म्हणजे काय?
भारत सरकारने 2017 मध्ये इलेक्टोरल बाँड योजना जाहीर केली होती. त्यानंतर ही योजना सरकारने 29 जानेवारी 2018 रोजी कायदेशीररित्या लागू केली होती. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास इलेक्टोरल बाँड हे राजकीय पक्षांना देणगी देण्याचे आर्थिक साधन आहे. इलेक्टोलर बॉंड हे प्रॉमिसरी नोटसारखे असतात. जे कोणत्याही भारतीय व्यक्तीला किंवा संस्थेला स्टेट बॅंक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयमधून खरेदी करता येतात. याद्वारे लोक किंवा संस्था त्यांना हव्या त्या राजकीय पक्षांना देणगी किंवा निधी देऊ शकतात. ही योजना केंद्र सरकारने राजकीय पक्षांच्या निधीतील पारदर्शकता वाढेल यासाठी सुरू केली असल्याचं सांगितलं होतं.
ज्याचे केवायसी तपशील उपलब्ध आहेत असे बँक खाते असलेल्या कोणत्याही देणगीदाराकडून निवडणूक रोखे खरेदी केले जाऊ शकतात. इलेक्टोरल बाँड्समध्ये पैसे देणाऱ्याचे नाव नसते. या योजनेंतर्गत, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विशिष्ट शाखांमधून रु. 1,000, रु. 10,000, रु. 1 लाख, रु. 10 लाख आणि रु. 1 कोटी अशा कोणत्याही मूल्याचे निवडणूक रोखे खरेदी करता येतात.