Download App

नरहरी झिरवळांच्या मनातही चलबिचल ? सुनील तटकरेंच्या महत्त्वाच्या बैठकीलाच मारली दांडी

नाशिक जिल्ह्यातील आमदार नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांच्या ही मनात चलबिचल सुरू असल्याचे आता समोर येत आहे.

  • Written By: Last Updated:

Narhari Zirwal absent Ncp state chief Sunil Tatkare meeting: विधानसभेला जास्तीत जागा जिंकण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे राज्याचा दौरा करत आहेत. त्यातून कार्यकर्ता मेळावा, पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. त्यात काही आमदार हे पुन्हा शरद पवार यांच्याकडे येणार असल्याचा राजकीय चर्चा आहेत. त्यात अजित पवार गटाचे परभणीचे जिल्हाध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते बाबाजानी दुर्रानी शरद पवार (Sharad Pawar) गटात आले आहे. तर नाशिक जिल्ह्यातील आमदार नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांच्या ही मनात चलबिचल सुरू असल्याचे आता समोर येत आहे.

फडणवीस-जरांगेंमधील भांडण नकली, ओबीसींना फसवण्यासाठी ते ठरवून भांडताहेत; आंबेडकरांचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे Sunil Tatkare) हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. त्यात नाशिकमध्ये कोणत्या जागा आपल्या मिळतील, किती जागा घेतल्या पाहिजे यावर चर्चा झाली आहे. परंतु या महत्त्वाच्या बैठकीला नरहरी झिरवळ हे गैरहजर होते. ते ही शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याचे चर्चा आहे. त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास तो अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का असू शकतो. बैठकीला का हजर राहिले नाहीत, याचा खुलासाही अद्याप झिरवळ यांनी केलेला नाही.

Olympics 2024 : रमिता जिंदालची दमदार कामगिरी; 20 वर्षांनी भारतीय महिला शूटरने गाठली अंतिम फेरी


मुलाचे राजकारण करणार सेट ?

शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा नाशिकमध्ये निष्ठावान संवाद मेळावा होता. या मेळाव्याला नरहरी झिरवळ यांचे पूत्र गोकुळ हे उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना मी मदत केली. त्यांना निवडून आणले आहे. माझ्या कार्यकर्त्यांची इच्छाही शरद पवारांबरोबर रहावे, अशी होती असे गोकुळ झिरवळ हे म्हणाले होते. त्यामुळे नरहरी झिरवळ हे शरद पवार गटाकडे पुन्हा येऊ शकतात किंवा आपल्या मुलाला शरद पवार गटाकडून विधानसभेच्या रिंगणात उतरू शकतात, अशा राजकीय चर्चा आहे.

follow us