Download App

नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारला दिल्लीत भीषण अपघात…

Hemant Godse Accident : नाशिकचे खासदार हेमंत गोडसे Hemant Godse Accident यांच्या गाडीला दिल्लीमधील (Delhi)बी.डी.रोडवर भीषण अपघात(accident) झाला आहे. या अपघातामध्ये खासदार गोडसे यांच्या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातामध्ये खासदार गोडसे हे थोडक्यात बचावले आहेत. हा अपघात नेमका का घडला? याचं कारण मात्र अद्यापही समोर आले नाही. हा अपघात इतका भीषण होता की कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.

Jayant Patil : आंबेडकरांना विश्वासात घेऊनच निर्णय; जागा वाटपावर जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti)पार्श्वभूमीवर खासदार हेमंत गोडसे हे संसदेच्या दिशेने जात असताना त्यांच्या पाठिमागून आलेल्या कारने त्यांच्या कारला जोराची धडक दिली. या अपघातामध्ये खासदार गोडसे यांच्या कारचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. खासदार गोडसे यांच्याबरोबर त्यांचे काही सहकारी देखील कारमध्ये होते, मात्र सुदैवाने यावेळी कोणालाही दुखापत झाली नाही.

भारतीय वंशाचा तरुण अमेरिकेच्या राजकारणात; कोण आहेत अश्विन रामास्वामी?

खासदार हेमंत गोडसे हे 2014 पासून नाशिक लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. 2014 आणि 2019 मध्ये खासदार गोडसे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवत मोठ्या फरकाने विजय मिळवला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड केल्यानंतर खासदार हेमंत गोडसे यांनी 2022 मध्ये त्यांनी शिंदे गटाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला.

राज्यासह देशभरामध्ये आज शिवजयंतीचा उत्साह सुरु आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्येही शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीमध्ये नाशिकचे प्रसिद्ध ढोल पथक शिव जयंती सोहळ्याला उपस्थित असते.

महाराष्ट्र भवन परिसरात शिवजयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळतो. याच कार्यक्रमासाठी हेमंत गोडसे जात असताना हा अपघात घडला असल्याची जनसामान्यांमध्ये चर्चा आहे.

follow us