Download App

“डॉक्टरांना योग्य ठिकाणी बसवा” शरद पवारांचा आ. लहामटेंवर हल्लाबोल

आज शेतमालाला भाव नाही. शेतकरी संकटात आहे. किमान शेतकऱ्याला उत्पादन खर्च निघेल एवढा तरी भाव मिळावा एवढी अपेक्षा आहे.

Sharad Pawar in Ahmednagar : ‘पाच वर्षांपूर्वी एका डॉक्टरला संधी दिली निवडून आणलं. मला वाटलं साधा माणूस आहे शब्दाला किंमत देईल. लोकांना साथ देईल. अकोल्यातच भाषण केलं शरद पवारांची साथ सोडणार नाही. मुंबईत गेला आणि भलत्यासोबतच जाऊन बसला. कुठे जाऊन बसायचं हेच जर यांना कळत नसेल तर त्यांना येणाऱ्या विधानसभेत योग्य ठिकाणी नेऊन बसवायचं’, अशा शब्दांत शरद पवारांनी (Sharad Pawar) अकोल्याचे आमदार किरण लहामटे यांच्यावर हल्लाबोल केला. अमितला तुम्ही पाठबळ द्या असे आवाहनही पवार यांनी अकोलेकरांना केले.

स्व. अशोकराव भांगरे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार अकोल्यात आले होते. यावेळी संगमनेर ते अकोले भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधीच शरद पवार अकोल्यात येणार असल्याने या कार्यक्रमाला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले होते. भाषणातून शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने स्पष्ट संदेश देत अमित भांगरे यांना पाठबळ देत अजित पवार गटात असलेले आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यावर टीकेची झोड उठवली.

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन? ‘मी असं बोललोच नाही’ शरद पवारांचा घुमजाव 

शरद पवार पुढे म्हणाले, ‘आज शेतमालाला भाव नाही. शेतकरी संकटात आहे. किमान शेतकऱ्याला उत्पादन खर्च निघेल एवढा तरी भाव मिळावा एवढी अपेक्षा आहे. कांदा उत्पादक अडचणीत आहे मात्र त्यांना न्याय देण्याची भूमिका सरकारची नाही. आज शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची किंमत मागण्याची मुभा नाही हेच या मोदी सरकारच्या काळात होत आहे. आजच्या राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांविषयी आस्था नाही.’

‘आजपासून बरोबर 70 दिवसांनी विधानसभेच्या निवडणुका (Maharashtra Election) आहेत. तुमची एकी असेल तर कुणी तुम्हाला धक्का लावू शकत नाही. हे राज्य तुमच्या हातात आल्याशिवाय राहणार नाही. आजवर मला 56 वेळा लोकांनी निवडून दिले. आता काही मागायचं नाही आता एकच मागणं आहे ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसांची सत्ता आली पाहिजे. कष्टकरी, शेतकरी, महिला, भगिनींच्या हिताची चिंता करणारं सरकार सत्तेत आलं पाहिजे’, असे शरद पवार यावेळी म्हणाले.

निलेश लंके (Nilesh Lanke) निवडणुकीला उभे राहिले त्यावेळी भाषेचा मुद्दा उपस्थित करत विरोधी उमेदवाराने त्यांना डिवचले. त्यांना इंग्रजी येत नाही ते तिथे जाऊन काय करणार? मात्र संसदेमध्ये तुम्हाला आपल्या मातृभाषेत भाषण करता येतं. मला धाकधूक होती मात्र निलेशची गाडी एकदा सुटली धडाधड इंग्लिश बोलूनच आला. तुमच्या सहकार्याने जे संसदेत आपण खासदार पाठवले ते आपल्यासाठी नक्कीच काम करतील’, असा शब्द देखील यावेळी शरद पवारांनी दिला.

Devendra Fadnavis On Sharad Pawar: मोदीजी शरद पवारांसाठी धोका, देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

follow us