Download App

आमदार जगतापांना सल्ला द्यायची तुमची उंची नाही; तृप्ती देसाईंवर राष्ट्रवादी युवतींचा पलटवार

आमदार संग्राम जगतापांना सल्ला द्यायची तुमची उंची नाही, असा पलटवार राष्ट्रवादी युवती प्रदेश कार्याध्यक्षा अंजली आव्हाडांनी तृप्ती देसाईंवर केला.

Anjali Avhad On Trupti Desai : आमदार संग्राम जगताप (Mla Sangram Jagtap) यांना सल्ला द्यायची तुमची उंची नाही, या शब्दांत राष्ट्रवादी युवती प्रदेश कार्याध्यक्षा अंजली आव्हाड (Anjali Avhad) यांनी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंवर पलटवार केलायं. शनीशिंगणापूर देवस्थान ट्रस्टमधून मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरुन टाकल्याच्या निषेधार्थ देसाई यांनी आमदार जगताप यांच्यावर तोंडसुख घेतलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादी युवतींकडून पलटवार करण्यात आलायं.

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत टोकाची भूमिका घ्यायची नव्हती पण… शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

पुढे बोलताना अंजली आव्हाड म्हणाल्या, अहिल्यानगर विधानसभा निवडणुकीत जगताप सलग तीनवेळा निवडून आले आहेत. त्यांना आवरायचं की साथ द्यायची हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठरवेल. मुस्लिम लोकांना शनीच्या मंदिरातून बरखास्त करण्यात आलंय, तुम्हाला मुस्लिमांचा एवढाच पुळका असेल तर ज्या पद्धतीने मुस्लिम लोकं शनी मंदिरात काम करीत होते त्याचं पद्धतीने पाठपुरावा करुन मुस्लिम समाजाच्या दर्गा मशीदमध्ये हिंदु लोकं काम करण्यासाठी घ्यावेत, यासाठी तुम्ही पुढाकार घेतला तर आम्ही या भूमिकेचं स्वागत करु, असं आव्हाड म्हणाल्या आहेत.

जागतिक संगीत दिनाच्या औचित्य अन् मुंबईत रंगणार देशातील पहिला सृजनशील, सांस्कृतिक रेडिओ महोत्सव

तसेच राष्ट्रवादी पक्ष हा फुले शाहु आंबेडकरांच्या विचारांना मानणारा पक्ष आहे, त्यांची विचाराधारा घेऊनच राष्ट्रवादीची वाटचाल करीत आहे. तृप्ती देसाईंनी आमदार संग्राम जगतापांविरोधात वक्तव्य केलंय. जगताप यांची भूमिका हिंदुधर्मरक्षक, हिंदुजनसेवक आहे, जगताप हे काम करीत असताना कोणत्याही पक्षाचा पंचा घालून काम करीत नाहीत, फक्त आणि फक्त हिंदुत्वाचं काम ते करीत आहेत त्याची प्रसिद्धी प्रचिती तुम्ही दाखवली असल्याचंही आव्हाड म्हणाल्या आहेत.

सल्लाच द्यायचा असेल तर राष्ट्रवादीत प्रवेश करा :
आमदार संग्राम जगताप यांना सल्ला देण्याइतकी कोणाची उंची झालेली नाही. संग्राम जगताप अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघात सलग तीनवेळा निवडून आलेले आहेत. कोणीही यावं आणि जगतापांना सल्ला द्यावा आत्तापर्यंत जगताप यांना सल्ला द्यायची कोणाची उंची झालेली तुमची तर नाहीच नाही, असा खोचक टोलाही अंजली आव्हाड यांनी देसाईंना लगावलायं.

follow us