शनिशिंगणापूर देवस्थान! हिंदुत्ववादी संघटनांचा इशारा…, मुस्लिम कर्मचाऱ्यांची कामावरून हकालपट्टी

Shani Shingnapur Devasthan :  गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील प्रसिद्ध असे श्री शनिशिंगणपुर देवस्थान चांगलेच चर्चेत आहे. यातच आता या

Shani Shingnapur Devasthan

Shani Shingnapur Devasthan :  गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील प्रसिद्ध असे श्री शनिशिंगणपुर देवस्थान चांगलेच चर्चेत आहे. यातच आता या देवस्थानची एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शनिशिंगणापूर देवस्थानने मंदिरात काम करणाऱ्या तब्बल 167 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. धक्कादायक बाब म्हणणे यामध्ये 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कामात अनियमितता आणि शिस्तचं पालन न केल्याच्या कारणावरुन या कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आले असल्याची माहिती शनि देवस्थानकडून (Shani Shingnapur Devasthan) देण्यात आलं आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, श्री क्षेत्र शनि शिंगणापूर मंदिरात मुस्लिम कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवरून चांगलेच वातावरण तापले होते. कर्मचाऱ्यांच्या या नियुक्तीवर हिंदुत्ववादी संघटनेकडून आक्षेप घेण्यात आला होता. मंदिर ट्रस्टमध्ये काम करणाऱ्या 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांना तातडीने काढून टाकण्यात यावे अशी मागणी ही या संघटनांनी केली होती. हिंदुत्ववादी संघटनांचा प्रशासनावर वाढता दबाव व यावर प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेलं होते. अखेर मंदिर प्रशासनाने याबाबत आपला निर्णय जाहीर केला.

श्री क्षेत्र शनि शिंगणापूर देवस्थान ट्रस्टने तिथे काम करणाऱ्या 167 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये 114 मुस्लिम कर्मचारी सध्या कार्यरत होते. अनियमितता आणि शिस्तच पालन न केल्याच्या कारणावरून काढण्यात आल्याचे संस्थेने स्पष्टीकरण दिलं आहे.

वादाचे कारण काय ?

शनी शिंगणापूर येथील हा वाद खऱ्या अर्थाने 25 मे 2025 रोजी समोर आला.  मंदिराच्या पवित्र चबुतऱ्यावर मुस्लिम कारीगरांनी ग्रिल बसवण्याचे, तसेच शनिदेवांच्या चबुतऱ्याची रंगरंगोटी व सफाई करण्याचे काम केले. ही बाब उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र मंदिर महासंघासह विविध हिंदू संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला. मंदिराच्या पवित्रतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप करत, संबंधित कर्मचाऱ्यांची तत्काळ हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

मंदिर प्रशासनाने स्पष्ट केली होती भूमिका मंदिर ट्रस्टमध्ये 114 मुस्लिम कर्मचारी काम करतात. मात्र या कर्मचाऱ्यांपैकी एकाही मुस्लिम कर्मचाऱ्याची कामाची नियुक्ती मंदिराच्या मुख्य गर्भगृहात नाही. ट्रस्टमधील हे कर्मचारी प्रामुख्याने शेती विभाग, कचरा व्यवस्थापन विभाग आणि शिक्षणाशी संबंधित कामांमध्ये कार्यरत आहेत.

Maharashtra Rain Alert: सावध राहा… पावसाचा जोर वाढणार, ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

तसेच 114 कर्मचाऱ्यांपैकी 99 कर्मचारी मागील काही महिन्यांपासून गैरहजर आहे त्यांची कामावरील अनुपस्थिती मुळे यांच्या पगारावर कात्री मारण्यात आली. तसेच उर्वरीत 15 कर्मचारी अनेक वर्षांपासून सेवा देत आहेत, ज्यात काहींचा अनुभव 20 वर्षांहून अधिक आहे.

follow us