शनिशिंगणापूर देवस्थानच्या नावाने बनावट ॲप…कोट्यावधींची फसवणूक

Shanishingnapur Temple Fake App : नगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर हे देशात ख्यात असलेल देवस्थान आहे. आता याच देवस्थानची एक अत्यंत महत्त्वाची व खळबळजनक माहिती समोर आली आहे. शैनेश्वर देवस्थानच्या नावाने बनावट ॲप (Shanishingnapur Temple Fake App) तयार करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शनेश्वर देवस्थानच्या अधिकृत ॲपऐवजी कर्मचाऱ्यांनी बनावट ॲप तयार करून भक्तांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम उकळल्याचा दावा कॉंग्रेसच्या कामगार विभागाने केला आहे. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सायबर पोलिसांमार्फत चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
नेमक प्रकरण काय?
याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांच्याकडे कॉंग्रेसच्या कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी माळवदे यांनी निवेदन सादर केले आहे. माळवदे यांच्या तक्रारीनुसार शनेश्वर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी बनावट ॲप तयार करून ऑनलाइन पूजेच्या नावाखाली भक्तांकडून पैसे गोळा केले. या ॲपवर दोन लाखांहून अधिक सदस्य नोंदणीकृत असून, प्रत्येक सदस्याकडून 1,800 रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हे शुल्क देवस्थानच्या अधिकृत तिजोरीत जमा न होता कर्मचाऱ्यांच्या खासगी खात्यांमध्ये जमा झाले आहे. यामुळे देवस्थानला कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका बसला असून, हा भ्रष्टाचाराचा गंभीर प्रकार असल्याचे माळवदे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
काँग्रेस पदाधिकारी यांची मागणी काय?
देवस्थान प्रशासनाला याबाबत विचारणा केली असता प्रशासन बोलायला तयार नाही. याबाबत प्रशासनाला खुलासा देखील मागितला आहे.परंतु याबाबत देवस्थान प्रशासन बोटचेपी भूमिका घेत आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष व शनिभक्ताकडून शनिशिंगणापूर येथे 9 जून रोजी पासून बेमुदत धरणे व उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे. आपणास या भ्रष्टाचाराबाबत आम्ही लेखी तक्रार देत आहोत.संबंधित घोटाळ्याच्या चौकशीचे आपण तातडीने आदेश देऊन दोषीवर तातडीने करावाई करण्यात यावी व तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी माळवदे यांनी केली आहे.
माजी विश्वस्तांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्ट शनि शिंगणापूर मंदिर परिसरात “ऑनलाईन पुजा अप तयार करुन शनि भक्तांची लुट करणारी ठोळी गेल्या अनेक वर्षापासून सक्रिय आहे. यात देवस्थानचे पुजारी कर्मचारी व अधिकारी यांनी संगणमताने देवस्थानची फसवणुक करुन करोडो रुपयांचा अपहार केला व निकटवर्तीयांच्या नावे बेहिशोबी मालमत्ता जमावलेली आहे. झालेल्या प्रकारावर पडदा टाकण्यासाठी देवस्थानच्या वतीने घाईघाईने लाईव्ह पुजा अप बंद करण्यात आले असले तरी वरील प्रकरणाची व्याप्ती पाहता कायदयाद्वारे शक्य असलेल्या यंत्रनामार्फत या आर्थिक गुन्हयाची चौकशी करण्यात यावी.
लक्ष्मण हाकेंनी 5 वर्षाचा पगार दिला नाही, ड्रायव्हरचा गंभीर आरोप
तसेच पुजारी ,ठराविक विभागाचे कर्मचारी व अधिकरी यांच्या संपत्तीची चौकशी व्हावी व त्यांचे बँक अकाऊटचे सर्व ट्रान्झीक्शनची चोकशीचे तात्काळ आदेश देण्यात यावे अशी मागणी माजी विश्वस्त वैभव शेटे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.