Nilesh Lanke : पारनेरचे आमदार निलेश लंके ( Nilesh Lanke )राष्ट्रवादी शरद पवार गटात ( NCP Sharad Pawar Group )प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. आमदार निलेश लंके हे नगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असल्याचे लपून राहिले नाही. मात्र महायुतीमध्ये सुजय विखे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे अखेर निलेश लंके शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे लंकेंचा लवकरच शरद पवार गटात प्रवेश होणार असल्याचं बोललं जात आहे.
Aayush Sharma: आयुष शर्माच्या ‘रुसलान’ चित्रपटाचा खतरनाक टीझर रिलीज
या भेटीमध्ये शरद पवार जयंत पाटील अमोल कोल्हे निलेश लंके यांची उपस्थित होते. हे सर्वजण मिळून शरद पवारांसोबत चर्चा करत आहेत. त्याचबरोबर यामध्ये नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके किंवा त्यांच्या पत्नी शरद पवार गटाच्या उमेदवारा असतील हे जवळपास निश्चित झाला आहे. या बैठकीनंतर एक पत्रकार परिषद होणार आहे. त्याचबरोबर याच ठिकाणी एक सभा देखील होणार आहे या सभेमध्ये कोरोनाच्या काळामध्ये निलेश लंके यांनी केलेल्या कामावर आधारित एका पुस्तकाचं प्रकाशन करण्यात येणार आहे.
BMC मध्ये नोकरीची संधी, महिन्याला 81 हजार रुपये पगार, कोण करू शकतं अर्ज?
त्याचबरोबर नुकताच राज ठाकरे यांच्या मनसेला राम राम ठोकलेल्या वसंत मोरे यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे या बैठकीनंतर निलेश लंके यांच्यासह वसंत मोरे हेदेखील शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. वसंत मोरे यांनी मनसेला सोडण्यामागे हेच कारण सांगितले जात आहे की, त्यांना लोकसभा निवडणूक लढवायची आहे. मात्र मनसे त्यासाठी तयार नसल्याने त्यांनी पक्ष सोडून आता थेट शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे वसंत मोरे हे देखील आज निलेश लंके यांच्यासोबत शरद पवार गटांमध्ये सामील होणार आहेत. हे स्पष्ट आहे.