Aayush Sharma: आयुष शर्माच्या ‘रुसलान’ चित्रपटाचा खतरनाक टीझर रिलीज

Aayush Sharma: आयुष शर्माच्या ‘रुसलान’ चित्रपटाचा खतरनाक टीझर रिलीज

Ruslaan Teaser Release: आयुष शर्माच्या (Aayush Sharma) ‘रुसलान’ (Ruslaan Movie) चित्रपटाचा टीझर समोर आला आहे. (Ruslaan Teaser) सलमान खानचा सर्वात जवळचा व्यक्ती म्हणून त्याची ओळख आहे. आयुष शर्मा पुन्हा एकदा फुल ऑफ ॲक्शन मोडमध्ये पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे. करण ललित बुटानी दिग्दर्शित आणि राधामोहन निर्मित, हा चित्रपट एक ॲक्शन-थ्रिलर असणार आहे, जो यावर्षी 26 एप्रिल रोजी थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज आहे.

‘रुसलान’च्या टीझरमध्ये आयुष शर्मा (Ayush Sharma) गिटार घेऊन एन्ट्री करताना दिसत आहे. टीझर बघून असा अंदाज वर्तवला जात आहे की, या चित्रपटात एका व्यक्तीची कथा दाखवली जाणार आहे, जी त्याच्या टॅलेंटच्या जोरावर स्वत:ला सिद्ध करत आहे. आयुष शर्माची व्यक्तिरेखा त्याच्या बंदूक आणि गिटारच्या जोरावर युद्धाची सिंफनी तयार करणार आहे. रोहित शेट्टीने (Rohit Shetty) इंस्टाग्रामवर ‘रुसलान’चा टीझर व्हिडिओ शेअर केला असून अभिनेत्याला त्याच्या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने लिहिले आहे की, ‘ऑल द बेस्ट आयुष.’

चित्रपटाची स्टारकास्ट: याआधी आयुष शर्माने चित्रपटाचे पोस्टर शेअर करून टीझर रिलीज करण्याची घोषणा केली होती. त्याने लिहिले होते की, ‘हाराची भीती नाही, माझ्यात फक्त माझ्या बंदूक आणि गिटारने जग जिंकण्याचा उत्साह आहे. वादळासारखा नाही… मी एक वादळ घेऊन आहे. रुस्लानचा टीझर 12 मार्च 2024 रोजी येतोय. ‘रुस्लान’मध्ये आयुष शर्मासोबत जगपती बाबू, मिस मिश्रा आणि विद्या माळवदे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. झहीर इक्बालचीही खास भूमिका असणार आहे.

OTT Platform Ban: अश्लील कंटेंट दाखवणाऱ्या 18 ओटीटी, 19 वेबसाइट अन् 10 ॲप्सवर मोठी कारवाई

अजय देवगणच्या चित्रपटाशी स्पर्धा: ‘रुस्लान’ हा सिनेमा 26 एप्रिल 2024 रोजी पडद्यावर रिलीज होणार आहे. अजय देवगणच्या ‘औरों में कहाँ दम था’ या चित्रपटाची टक्कर चित्रपटगृहांमध्ये होणार आहे. ‘और में कहाँ दम था’मध्ये अजय देवगणसोबत तब्बू, जिमी शेरगिस, सई मांजेरकर आणि शंतनू माहेश्वरी महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज