Nilesh Lanke : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपाने खासदार सुजय विखे यांना ( Sujay Vikhe ) पुन्हा तिकीट दिलं आहे. मात्र महाविकास आघाडीचा उमेदवार कोण यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामध्ये आता अजित पवार गटामध्ये असताना देखील तुतारी हातात घेतलेले निलेश लंके ( Nilesh Lanke ) शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे त्यांना महविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर होणार का? या चर्चांना उधान आले आहे.
loksabha Election : पुण्याच्या जागेबाबत ट्वीस्ट; शरद पवारांनाच उभे राहण्याचा आग्रह
दरम्यान शरद पवार हे मंगळवारी मोदीबाग येथील निवासस्थानी होते. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांना भेटले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबतही चर्चा झालेली आहे. त्यावेळी ठाकरे गटाच्या प्रवक्ता व उपनेत्या सुषमा अंधारे, शिवसंग्राम पक्षाच्या प्रमुख ज्योती मेटे यांनीही शरद पवार यांची भेट घेतली आहे. मेटे या बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छूक आहेत. त्यामुळे या दोन इच्छूक उमेदवारांनी पवारांच्या भेटी घेतल्याने त्यांच्या उमेदवारी जाहीर होणार का? या चर्चांना उधान आले आहे.
अदा शर्माच्या ‘बस्तर: द नक्षल स्टोरी’ची चार दिवसांतच बिकट अवस्था, जाणून घ्या कलेक्शन
दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाला सोडून शरद पवार गटात सामिल होणार असल्याची चर्चा रंगली असतानाच. लंकेंनी शरद पवारांची भेट घेतली होती. भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शरद पवारसाहेब सांगतील तोच आदेश असल्याचं ठणकावून सांगितलं होतं. त्यामुळे एका अर्थाने आपण शरद पवारांसोबतच असल्याचे संकेत लंकेंनी दिले आहेत.
तसेच पवारांच्या आजच्या बैठकीमध्ये पुण्यातील लोकसभा महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आहे. येथून मीच निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, अशी आग्रही भूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्याची माहिती खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.