अदा शर्माच्या ‘बस्तर: द नक्षल स्टोरी’ची चार दिवसांतच बिकट अवस्था, जाणून घ्या कलेक्शन
Bastar Box Office Collection Day 4: ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ (Bastar: The Naxal Story) 15 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चाहते खूप दिवसांपासून अदा शर्माच्या (Adah Sharma) चित्रपटाची वाट पाहत होते. मात्र, प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) संघर्ष करत आहे आणि रिलीजच्या 4 दिवसांनंतरही 4 कोटींची कमाई करू शकलेला नाही.
SACNILC च्या अहवालानुसार, ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ने पहिल्या दिवशी 40 लाखांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 75 लाखांची कमाई केली होती तर तिसऱ्या दिवशी चित्रपटाचे कलेक्शन 85 लाख रुपये होते. आता चौथ्या दिवसाचे आकडे समोर आले असून त्यानुसार ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ने एकूण 24 लाखांची कमाई केली आहे. यासह चित्रपटाचे एकूण कलेक्शन 2.24 कोटींचा गल्ला कमावला आहे.
Mirzapur 3: तीन वर्षांनंतर चाहत्यांना पुन्हा ‘गुड्डू भैय्या’ची झलक दिसणार, शेअर केला व्हिडिओ…
‘बस्तर: द नक्षल स्टोरी’ ‘योद्धा’च्या मागे
अदा शर्माचा ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ चित्रपटगृहांमध्ये सिद्धार्थ मल्होत्राच्या ॲक्शन-थ्रिलर ‘योद्धा’शी भिडला आहे. ‘योद्धा’ सातत्याने ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ला पराभूत करत असून संघर्षाचा प्रभाव अदा शर्माच्या चित्रपटावर पाहायला मिळत आहे. तर ‘योद्धा’ चित्रपटगृहांमध्ये चांगला व्यवसाय करत आहे. सिद्धार्थ मल्होत्राच्या या चित्रपटाने चार दिवसांत एकूण 19 कोटींचा कमाई केली आहे.
कथा काय आहे?
‘बस्तर: द नक्सलाइट स्टोरी’ छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील नक्षलवादी बंडखोरीवर आधारित आहे. या चित्रपटात अदा शर्मा आयपीएस अधिकारी नीरजा माधवनच्या भूमिकेत दिसत आहे. सनशाईन पिक्चर्सच्या बॅनरखाली हा चित्रपट सुदीप्तो सेनने दिग्दर्शित केला आहे. चित्रपटात अदा शर्माशिवाय इंदिरा तिवारी, विजय कृष्णा, शिल्पा शुक्ला आणि यशपाल शर्मा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.