कांद्याला भाव अथवा नोकरी द्या…शेतकरी पुत्राचं गुजराती भाषेत थेट PM मोदींना पत्र

कांद्या भाववाढीवरुन अहिल्यागरच्या एका संतप्त शेतकरी पुत्राने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पक्ष लिहुन आपल्या व्यथा मांडल्या आहेत.

Untitle (41)

Untitle (41)

Onion Rate : कांद्याचे दर सातत्याने कोसळत असून यामुळे बळीराजा हतबल झाला असून संतापलेल्या एका शेतकरी पुत्राने थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांना गुजराती भाषेतून पत्र पाठवले आहे कांद्याला योग्य भाव मिळावा, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे तसेच शेतीमालाला भाव देणे शक्य नसेल तर आम्हाला सरकारी नोकऱ्या द्या, आम्ही शेती सोडून देतो, अशा तीव्र शब्दांत शेतकऱ्याने सत्ताधाऱ्यांवरती रोष व्यक्त केला.

कांद्याला योग्य दर मिळत नसल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला असून ठीक ठिकाणी कांदा दरवाढीसाठी आंदोलने देखील करण्यात येत आहे. शेतकऱ्याची हाक थेट देशाच्या सर्वोच्च पदावर असलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी एका शेतकरी पुत्राने अनोखी शकल लढवली मोदी यांना मराठी भाषा समजत नसल्याने त्यांना शेतकऱ्याचे प्रश्न समजणार नाही. यासाठी आम्ही गुजराती भाषेतून म्हणजे त्यांच्या मातृभाषेतून त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न व कांद्यावर व्हावी याबाबत पोस्टातून पत्र पाठवले आहे.

सुनेत्रा पवार यांच्या जागी कोण? राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या निवडणुकीची तारीख जाहीर

शेतकरी पुत्र राहुल बहिरत यांनी म्हटले की, आयात निर्यातीचे धोरण हे केंद्रातून ठरत असल्याने कांद्याच्या योग्य दराची जबाबदारी ही केंद्राची आहे. यामध्ये राज्याचा मोठा हस्तक्षेप नसतो पेट्रोल डिझेल तसेच बी बियाण्याचे दर वाढले आहे. मात्र, कांद्याला दर मिळत नाही उलट कांदा लागवड करण्यासाठी मोठा खर्च येतोय.

अवघे 50 पैसे ते जास्तीत जास्त आठ रुपये किलो कांदा हा विकला जातो. यातून उत्पादन खर्चही निघत नाही. आम्ही वेळोवेळी पंतप्रधान मोदी यांना मराठी भाषेतून पत्र व्यवहार करून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या होत्या. मात्र, मोदी गुजराती असल्याने त्यांना मराठी भाषा समजत नाही. यामुळे त्यांना गुजराती भाषेतून पत्र देत कांद्याला 30 रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

Cockroach Janta Party : राजकारणात नको, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही…अभिजितच्या आई वडिलांनी काय सांगितलं?

कांद्याला भाव मिळत नसल्याने संतप्त झाल्या शेतकऱ्याने थेट मोदी तुम्ही आमच्या इथे आम्ही स्वतः आमचा सातबारा उतारा तुमच्या नावावर करून देतो अन्यथा आम्हाला सरकारी नोकरी तरी द्यावी जेणेकरून आम्ही शेती करणे हा व्यवसाय सोडून देतो, अशा तीव्र शब्दांमध्ये संतुष्ट शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या

Exit mobile version