सुनेत्रा पवार यांच्या जागी कोण? राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या निवडणुकीची तारीख जाहीर

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली असून सुनेत्रा पवार यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार?

Untitle (39)

Rajyasabha Election : राज्यसभेच्या एकूण 24 जागांसाठी निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. या 24 जागांवर 18 जून रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रासह एकूण 10 राज्यांतील खासदार निवृत्त झाले आहेत. तर काहींनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे या निवडणुका होत आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांची जागा रिक्त झाली असून त्याजागी राष्ट्रवादी कुणाला उमेदवारी देते याकडे लक्ष लागलं आहे. या जागेसाठी मोठी लॉबिंग होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

Maratha Reservation : हल्ला अन् धमकीचं समर्थन..,; आमदार लाड यांना धमकीचा फोन, जरांगे पाटील काय म्हणाले?

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळल्यानंतर राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यसभेच्या या रिक्त जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलीयं. एकूण 10 राज्यात राज्यसभेच्या 24 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम आयोगाकडून जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात एका रिक्त जागेसाठी 18 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

भाविकांवर काळाचा घाला; नैनितालमध्ये 100 फूट खोल दरीत कार कोसळून लहान मुलासह पाच जणांचा मृत्यू

दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. तेव्हापासून राज्यसभेची ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर पार्थ पवार यांची या जागेसाठी वर्णी लागण्याची शक्यता होती. मात्र, पार्थ पवार यांची राज्यसभेच्या इतर जागेवरुन खासदारपदी निवड झाली. त्यानंतर आता या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेकांची भाऊगर्दी असून यामध्ये विशेषत: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, विक्रम काकडे , जय पवार, अविनाश आदिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

विधानपरिषदेसाठी विक्रम काकडे यांचं नाव आग्रही होते. ते पार्थ पवारांचे विश्वासू सहकारी मानले जातात. दिवंगत अजित पवार यांच्याबरोबरही विक्रम काकडे यांनी काम केले आहे आणि त्यांना राजकीय पार्श्वभूमी असून त्यांचे वडील संजय काकडे माजी खासदार आहेत. मात्र, विधानपरिषदेसाठी विक्रम काकडे यांना संधी न देता झिशान सिद्धीकी यांना संधी देण्यात आलीयं. त्यामुळे विधानपरिषदेसाठी संधी न मिळाल्यानंतर आता विक्रम काकडे यांनी राज्यसभेची मिळणार का? असा सवाल उपस्थि होत आहे.

सहा लढती जिंकत प्लेऑफचे समीकरण फिरविले, पण केकेआरला टॉप चारसाठी किती संधी ?

दरम्यान, येत्या 1 जूनपासून पोटनिवडणुकीला सुरुवात होणार असून 8 जूनला अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे. तर 9 जून रोजी उमेदवाराच्या अर्जाची छाननी होईल. अर्ज मागे घेण्याची मुदत 11 जून असून 18 जून रोजी सकाळी 9 ते 4 वाजतेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणा आहे. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होईल.

follow us