Ahilyadevi Holkar Jayanti : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त विचार भारती व जनसेवा फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आहिल्यानगर गौरव दिंन व पारकमंत्री सांस्कृतीक महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. हे आयोजन २९ ते ३१ मे दरम्यान, अहिल्यानगर शहरात करण्यात आलं आहे. (Jayanti) या महोत्वा अंतर्गत चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं आहे. विविध तीन वयोगटांमध्ये ही स्पर्धा होणार असून २२ मे पर्यंत स्पर्धकांनी दिलेल्या विषयांवर चित्र जमा करावेत, अशी माहिती भारतीचे सचिव सुधीर लांडगे यांनी दिली.
अशोक डोळसे यांनी सांगितले की, पुण्यश्वोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर होणारी ही स्पर्धा तीन गटांमध्ये होणार आहे. इयत्ता पाचवी ते सातवी गटासाठी विषय आवडते मंदीर, आवडता किल्ला व पुण्यश्वोक अहिल्यादेवी यांनी प्रस्थापित केलेले शिवलिंग आठवी ते दहावी गटासाठी विषय पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे वक्तिचित्र, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जीवनातील एक प्रसंग व पु्ण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी नदीकिनारी बांधलेला घाट. तसंच, खुला महाविद्यालयीन, व्यावसायिक चित्रकार आणि कला रसिक गटासाठी विषय पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे व्यक्तिचित्र, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी बांधलेले शिवमंदिर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या स्मारकाची तुमची काल्पनिक प्रतिमा. हे विषय देण्यात आले आहेत. प्रत्येक गटातून १० स्पर्धकांना आकर्षक रोख पारितोषइकं देण्यात येणार असून निवडलेल्या उत्कृष्ठ चित्रांचे प्रदर्शनाचे आयोजन सावेडीच्या जॉगिंगपार्क मैदानावर करण्यात आलं आहे.
सरकारकडून फसवणूक, निवडणुकीपुरताच लाडक्या बहिणींचा वापर; लंकेंचा महायुतीवर निशाणा
या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी चित्र काढण्यासाठी शहरातील विविध भागांमधील सेंटरमधून पेपर घेऊन जावा व २२ मे पर्यंत जेथून पेपर घेतला आहे. त्याच ठिकाणी जमा करणे आवश्यक आहे. स्पर्धकांनी दिलेल्या विषयावर व कागदावर घरीच चित्र काढावे. विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी तसंच, हौशी व व्यावसायिक चित्रकार यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे. आर्थिक माहितीसाठी अशोक डोळसे 9890269698 या नंबरवर संपर्क साधावा असं आवाहन जनसेवा फाउंडेशनचे निखील वारे यांनी केलं आहे.
स्पर्धकांना चित्रंसाठी पेपर मिळण्याची ठिकाणं पुढीलं प्रमाणे आहेत. चंदे बेकर्स वडगाव गुप्ता, परफेक्ट टायर्स बोल्हेगाव नागापूर, कोणार्क ट्रेडर्स तपोवन रोड, साई कलेक्शन भिस्तबाग चौक, सूर्यकांत फर्निचर पाईपलाईन रोड, पारिजात कॉर्नर गुलमोर रोड, लोटस मेडिकल कलानगर रोड, अशोका आर्ट गॅलरी प्रोफसर कॉलनी चौक, सागर मेडिकल तारकपूर, शुभम मेडिकल दिल्ली गेट, अक्षय अगरबत्ती डाळ मंडई, सिद्धेश्वर मेडिकल माळीवाडा, डोळसे ऑइल डेपो भुतकरवाडी, महालक्ष्मी मल्टीस्टेट बुरुडगाव, जलाराम बेकर्स केडगाव, हराळ हॉस्पिटल जवळील मेडिकल कल्याण रोड, भंडारी मेडिकल भिंगार वेश, जनकल्याण रक्तपेढी नालेगाव या ठिकाणांहून पेपर सकाळी 11 ते 1 व सायंकाळी 4 ते6 या वेळेत घेऊन जावा व पु्न्हा याच ठिकाणी जमा करावा.