Dhule News : जेवणातून विषबाधा झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशातच आता धुळ्यातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात भावी पोलिसांना अन्नातून विषबाधा (Food poison) झाल्याचं समोर आलं आहे. जवळपास 80 विषबाधा झालेल्या पोलिसांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. यामध्ये 200 पोलिसांना विषबाधा झाली असल्याची शक्यता आहे. मात्र, 20 पोलिसांना अधिकच त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
शरद पवारांचं नाव आणि फोटो वापरू नका, SC ने अजित पवारांना फटकारलं
पोलिस भरतीमध्ये भरती झालेले भावी पोलिसांचं प्रशिक्षण सुरु आहेे. धुळे पोलिस प्रशिक्षण केंद्रामध्ये 630 पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. सायंकाळी पोलिसांना जेवण देण्यात आलं होतं. जेवण केल्यानंतर नियमितपणे रोल कॉलसाठी आलेल्या पोलिसांना अचानक उलटी आणि मळमळचा त्रास सुरु झाला. जवानांना त्रास सुरु झाल्याचं समजताच त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सध्या स्थिती नियंत्रणात असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सयाजी भामरे यांनी दिली आहे.
“राजकारणात काहीही होऊ शकते” : लंकेंचे सूचक विधान, पुण्यात पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश?
यातील सुमारे 12 ते 15 जवान धुळे शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षता विभागात देखील उपचारासाठी पोहोचले .मात्र त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्राने दिली. दरम्यान वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात अचानक मोठ्या प्रमाणावर मळमळ आणि उलटीचा त्रास होत असलेले जवान दाखल झाल्याने त्या ठिकाणी देखील गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
इंडियन बॅंकेत 146 जागांसाठी भरती सुरू, महिन्याला 89 हजार रुपये पगार, आजचा करा अर्ज….
दरम्यानन, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने उपचार सुरू करून स्थिती नियंत्रणात ठेवली. दरम्यान या सर्व जवानांची परिस्थिती धोक्याबाहेर असली तरी त्यांचे निरीक्षण आणि उपचार केले जात आहे. या जवानांमधील सुमारे आठ जणांना जास्तीचा त्रास होत असून त्यांच्यावर देखील तातडीचे उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टर भामरे यांनी दिली आहे. दरम्यान जवानांना विषबाधा झाल्याची माहिती मिळाल्याने धुळे शहरातील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात एकच गर्दी केली होती.