“राजकारणात काहीही होऊ शकते” : लंकेंचे सूचक विधान, पुण्यात पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश?

“राजकारणात काहीही होऊ शकते” : लंकेंचे सूचक विधान, पुण्यात पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश?

अहमदनगर : “लोकसभा निवडणूक लढण्याबाबत आमचे काहीही नियोजन नाही. माझे याबाबत कोणाशी काहीही अधिकृत बोलणे झालेले नाही. पण राजकारणात काहीही होऊ शकते”, असे म्हणत पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षप्रवेशाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. लंके यांच्या कोरोना काळातील कामाच्या अनुभवांवर आधारित पुस्तकाचे पुण्यात आज (14 फेब्रुवारी) प्रकाशन होणार आहे. त्यासाठी ते पुण्याकडे रवाना झाले आहेत. याच कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये लंकेंचा पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा आहे.

निलेश लंके यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे. (NCP MLA Nilesh Lanka has reacted to the talk of NCP (Sharad Chandra Pawar) joining the party.)

“एका फोनवर माझ्यासाठी पहाटेचा शपथविधी होऊ शकतो पण, शरद पवार”… जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

या चर्चांच्या पार्श्वभूमीवर बोलताना लंके म्हणाले,  लोकांचा सूर काय आहे ते पाहून निर्णय घ्यावा लागेल. पण सध्या तरी लोकसभा निवडणूक लढण्याबाबत आमचे काहीही नियोजन नाही. माझे याबाबत कोणाशी काहीही अधिकृत बोलणे झालेले नाही. मात्र राजकारणात काहीही होऊ शकते. राज्यसभेची मतदान प्रक्रिया सुरु होती. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्याशी आम्ही गप्पा मारल्या होत्या, विविध मुद्द्यांवर चर्चा केली होती. तो दिवस गेला अन् दुसऱ्या दिवशी बातमी आली की एकनाथ शिंदे यांच्यासोबत काही आमदार नॉट रिचेबल झाले आहेत, त्यांचे फोन बंद आहेत. अशाही काही घटना घडतात, असेही सूचक विधान त्यांनी केले.

Bharat Jodo Nyay Yatra : शेतकरी दुर्लक्षित अन् मोदी समुद्र, हवाई सफारीत व्यस्त; नाशिकमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल

लंकेंबाबत काय म्हणाले अजित पवार?

निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे. त्याने वेगळा निर्णय घेऊ नये असे माझी त्याला विनंती आणि आवाहन आहे. त्याची माझी कालच भेट झाली. मात्र तसा निर्णय घ्यायचा असेल तर त्याला आमदारकी सोडावी लागेल, नाहीतर तो अपात्र होईल. तसेच कायद्यानुसार अशा प्रकारे पक्षाच्या विरोधी भूमिका घेतल्यास पक्ष कारवाई करू शकतो, असा इशारा यावेळी अजित पवार यांनी निलेश लंके यांना दिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube