४० पोलिसांना विषबाधा! वडेट्टीवारांचे सरकावर टीकास्त्र, म्हणाले, ‘पोलिसांच्या आरोग्याशी खेळ…’

४० पोलिसांना विषबाधा! वडेट्टीवारांचे सरकावर टीकास्त्र, म्हणाले, ‘पोलिसांच्या आरोग्याशी खेळ…’

Vijay Wadettiwar : 40 प्रशिक्षणार्थी पोलीस (Police) कर्मचाऱ्यांना रविवारी (दि. 09 मार्च) रोजी जेवणातून विषबाधा (poisoning) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. चंद्रपुरमध्ये (Chandrapur) ही घटना घडली. त्यामुळं पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, ही घटना समोर येताच सर्व कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, आता राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवा (Vijay Vadettiwar) यांनी सरकारवर निशाणा साधला.

Box Office Collection: ‘शैतान’चा बॉक्स ऑफिसवर डंका! अवघ्या 3 दिवसांत छप्परफाड कमाई 

पोलिसांच्या खांद्यावर राज्याच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. मात्र, त्यांच्यासाठी उत्कृष्ट प्रतीचे जेवणही डबल-ट्रीपल इंजिन सरकारच्या काळात उपलब्ध होत नाही, अशी टीका करत पोलिसांच्या आरोग्याशी खेळ होऊ नये याची तरी किमान काळजी घ्या, अशा शब्दात वडेट्टीवारांनी सरकारला फटकारलं.

40 वर्षांच्या संघर्षाला न्याय! प्राधिकरण परतावा प्रश्न सुटला; आमदार महेश लांडगेंनी करुन दाखवलं! 

वडेट्टीवार यांनी एक्सवर एक पोस्ट करत लिहिलं की, चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर (ता.बल्लारपूर) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यक्रमासाठी सेवेत असलेल्या पोलिसांना निकृष्ट जेवण दिल्यामुळे ४१ पोलिसांना विषबाधा झाली आहे. तुकूम येथील पोलिस मुख्यालयाच्या कॅन्टीनमधील अन्न खाल्याने ही विषबाधा झाली आहे.

ते म्हणाले, पोलिसांच्या खांद्यावर राज्याच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. दिवस-रात्र, तहान-भूक विसरून हे सारे झटतात. अनेकदा स्वत:च्या कुटुंबाला त्यांना वेळ देता येत नाही. सेवेसाठी तत्पर असलेल्या या समाजाच्या घटकासाठी साधे उत्कृष्ट प्रतीचे जेवणही डबल-ट्रीपल इंजिन सरकारच्या काळात उपलब्ध होऊ नये? राज्यातील बहुतांश पोलीस कँटीनची हीच स्थिती आहे. सरकारमधील तीनही इंजिन हे कंत्राटदारांच्या गर्दीने भरलेले डबे ओढण्यात व्यस्त आहेत, अशी टीका वडेट्टीवारांनी केली.

या व्यस्ततेत समाजहितासाठी, समाजाच्या सेवेसाठी झटणाऱ्या पोलिसांच्या आरोग्याशी खेळ होऊ नये याची तरी किमान काळजी घ्या, असंही वडेट्टीवार म्हणाले.

9 पोलिसांची प्रकृती चिंताजनक
दरम्यान, विषबाधा झाल्याचं समजताच सर्व प्रशिक्षणार्थींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 9 पोलिसांची प्रकृती चिंताजनक असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयातून सांगण्यात येत आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. उर्वरित सर्व पोलिसांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube