Pratap Dhakane : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते प्रताप ढाकणे (Pratap Dhakane ) यांनी आजच्या मेळाव्यामध्ये अजित पवारांवर (Ajit Pawar) निशाणा साधला. तसेच यावेळी त्यांनी शरद पवारांचे खांदे खंबीर बनवण्यासाठी कार्यकर्त्यांना पेटून उठण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, अजितदादांनी स्वार्थ साधला पण पक्ष किंवा पक्ष चिन्ह नसल्याने शरद पवारांचं काहीही अडत नाही. आज (7 फेब्रुवारी) ला अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा आज कार्यकर्ता मेळावा पार पडला यावेळी ते बोलत होते.
‘चोर न्यायाधीश झाला अन् चोरांना सोडून दिलं’; NCP च्या निर्णयावर ठाकरेंची बोचरी टीका
प्रताप ढाकणे यांनी सांगितले की, शरद पवार गटातील हे सर्व तालुक्यातील कार्यकर्ते मुरलेले कार्यकर्ते आहेत. त्यामुळे आपल्याला जी लढाई लढाईची आहे ती पवार साहेबांसाठी नाहीतर आपल्यासाठी लढाईची आहे. आमदार खासदारकी मिळवण्यासाठी नाही. तर महाराष्ट्र वाचवण्यासाठी आणि शेतकरी जिवंत ठेवण्यासाठी करायची आहे.
आमिर सोबत असलेल्या नात्यावर किरण रावने केला मोठा खुलासा, म्हणाली, ‘प्रामाणिकपणा…’
कारण शरद पवार साहेबांचं काहीही अडत नाही. त्यांना त्यांचं नावच पुरेस आहे. त्यांना पक्ष किंवा पक्ष चिन्ह नसल्याचा काही फरक पडत नाही. तसेच त्यांनी त्यांच्या योगदानातून पुरोगामी विचारसरणीतून देशपातळीपर्यंत जे काही कार्य करून ठेवलं आहे. त्याला हात लावण्याची हिंमत कोणातही नाही. हीच शरद पवार यांची ताकद आहे. त्यांचे पक्ष आणि चिन्ह घेतल्याने त्यांना काहीही फरक पडत नाही.
‘जो बापाला म्हातारपणात लाथ मारतो तो..,’; यशोमती ठाकूर दादांवर कडाडल्या!
आज जर आपण गप्प बसलो तर उद्याच्या नव्या पिढीला आपण उत्तर देऊ शकणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील बहुजन समाज वाचवण्यासाठी आपल्याला आगामी निवडणूक लढवावी लागणार आहे. ही निवडणूक कुठल्याही एका पक्षाची नसेल. तर ती पुरोगामी आणि शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र वाचवण्यासाठीची निवडणूक असेल.
ज्याप्रमाणे देशातील मुठभर लोकांविरोधात शाहू, फुले, आंबेडकरांनी लढा दिला त्याचप्रमाणे गेली साठ वर्ष शरद पवारांनी हे तसाच लढा दिला आहे. त्यांना शरण आणण्यासाठी सर्व काही प्रयत्न केले गेले. शेवटचा प्रयत्न म्हणजे त्यांचा पक्षही फोडण्यात आला. तरी देखील ते झुकले नाहीत. ते आजही लढत आहेत. कारण हा महाराष्ट्र वाचवायचा आहे. त्यामुळे आपण देखील हा महाराष्ट्र वाचवण्यासाठी शरद पवारांना खंबीर साथ देण्यासाठी एकत्र येऊयात असं आवाहन प्रताप ढाकणे यांनी कार्यकर्त्यांना केलं. तसेच त्यावेळी म्हणाले की, अजित पवारांसोबत जे गेले त्यांना सांगा की, त्यांनी त्यांचा स्वार्थ बघितला. त्यात शरद पवारांचं काय चुकलं? असा सवालही ढाकणे यांनी केला.