आमिर सोबत असलेल्या नात्यावर किरण रावने केला मोठा खुलासा, म्हणाली, ‘प्रामाणिकपणा…’
Kiran Rao Aamir Khan: किरण राव (Kiran Rao) गेल्या 16 वर्षांपासून आमिर खानच्या (Aamir Khan) प्रॉडक्शन हाऊस ‘आमिर खान प्रोडक्शन’शी जोडली गेली आहे. लवकरच किरण तिच्या ‘लापता लेडीज’ (Laapataa Ladies Movie) या चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसच्या (box office) दुनियेत दिग्दर्शक म्हणून पुनरागमन करत आहे. वैयक्तिक आयुष्यात एकमेकांपासून वेगळे असूनही आमिर खान आणि किरण राव यांनी एकत्र काम करणे सुरूच ठेवले आहे.
एका मुलाखतीमध्ये किरण रावने आमिर खानसोबतच्या व्यावसायिक संबंधांबद्दल सांगितले. वास्तविक जीवनात दोघेही एकमेकांचे क्रूर टीकाकार कसे आहेत हे तिने यावेळी सांगितले आहे. किरण राव म्हणाल्या की, “आम्ही एकमेकांवर अवलंबून आहोत कारण आम्ही एकमेकांशी उघडपणे सत्य बोलू शकतो. आणि मला वाटतं नाती अशी असावीत. नात्यात प्रामाणिकपणा नसेल तर नात्याची प्रगती होत नाही.
आम्ही दोघेही सर्जनशील लोक आहोत. आम्ही दोघेही दीर्घकाळापासून एकाच क्षेत्रात काम करत आहोत. जर आपल्यात सत्य आणि प्रामाणिकपणा नसेल तर या नात्याला काही अर्थ नाही. अनेकवेळा असे घडले आहे की आमचे एकमेकांशी पटत नाही. एकमेकांच्या प्रत्येक सर्जनशील निर्णयाशी आपण सहमत असूच असे नाही. आमच्यात खूप वाद देखील होत असतात.
Hrithik Roshan War: हृतिक रोशनच्या ‘वॉर 2’ संदर्भात चाहत्यांना दिली गूडन्यूज, म्हणाला…
किरण राव पुढे म्हणाली, “अनेकदा मी आमिरच्या म्हणण्याशी सहमत नाही. पण शेवटी दिग्दर्शक, निर्माता किंवा अभिनेत्याला काय हवे आहे, त्यानुसार तो निर्णय घेतले जातात. मग तो आमिर खान असो वा मी. पण जेव्हा प्रतिक्रिया द्यायची वेळ येते तेव्हा आम्ही एकमेकांना उघडपणे सांगतो की मला ही गोष्ट आवडत नाही. हे माझ्यासाठी काम करत नाही. अभिप्राय दिल्यानंतर, पुढे काय करायचे ते आम्ही इतरांवर सोडतो. पण तुमची बाजू आणि तुमचा दृष्टिकोन मांडणे महत्त्वाचे आहे.