‘जो बापाला म्हातारपणात लाथ मारतो तो..,’; यशोमती ठाकूर दादांवर कडाडल्या!

‘जो बापाला म्हातारपणात लाथ मारतो तो..,’; यशोमती ठाकूर दादांवर कडाडल्या!

Yashomati Thakur On Ajit Pawar : जो स्वत:च्या बापाला म्हातारपणात लाथ मारतो, तो जनता काय सांभाळणार, या शब्दांत काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कडाडल्या आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने काल राष्ट्रवादी पक्ष अजित पवार यांचाच असल्याचा निर्णय दिला आहे. एवढंच नाहीतर पक्ष आणि घड्याळ चिन्हही अजित पवार गटाला देण्यात आलं आहे. त्यावरुन विरोधकांकडून अजित पवारांवर सडकून टीका केली जात आहे.

मेगा सिक्वेल Goodachari 2 साठी ‘या’ अभिनेत्याचं नाव चर्चेत, आदिवीसोबत स्क्रीन शेअर करणार

यशोमती ठाकूर म्हणाल्या, हा असंवैधानिक निर्णय आम्हाला अपेक्षित होता. आता सर्वोच्च न्यायालयात गेलं पाहिजे. याआधीह जेव्हा बिहार, आणि चंदीगढमध्ये जे घडलं होतं त्यावरुन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी फटकारलं होतं. हे लोकशाहीच्या विरोधात असून लोकशाहीचा खून केल्यासारखं सुरु असल्याचं म्हणत न्यायालयाने फटकारलं होतं. राज्यात जे काही सुरु आहे ते अशोभनीय असून कोणीही येत, चिन्ह कसं मिळत? कोण पक्ष फोडतं? हे एक आश्चर्यचं असल्याचं यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केलं आहे.

तसेच एखादा दारु पिणारा माणूस जसा बायकोला ठोकतो आणि बायको नंतर सकाळी उठून परत त्याचं खावडते, अशी परिस्थिती झालेली आहे. आपलं चारित्रावर ते लोकं डाग लावत आहे हे जबाबदार लोकांना काहीचं कसं कळत नाही. महाराष्ट्राची जनता या सर्व गोष्टींना सडेतोड उत्तर देणार असल्याचा इशाराही ठाकूर यांनी अजित पवार गटाला दिला आहे.

ठाकरेंनी सोडली ‘साथ’ तर संकटात येईल आघाडीचा ‘हात’; ‘बिहार’नंतर महाराष्ट्रात कशाची चर्चा?

जो बापच सांभाळू शकत नाही तो जनता काय…
अजित पवार सत्ताधाऱ्यांसोबत का गेले आहेत. त्यांची काय मजबूरी होती, अजित पवार यांना सत्तेत का जावंस वाटलं? जो व्यक्ती स्वत:च्या बापाला म्हातारपणात लाथ मारतो तो जनतेचे काय करणार? बापच नाही सांभाळू शकला तो जनता काय सांभाळणार, अशी सडकून टीका यशोमती ठाकूर यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने काल मोठा निकाल देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला बहाल केलं. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय आल्याने शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. आता शरद पवार गटाला लवकरात लवकर नवीन पक्ष चिन्ह आणि नावाची मागणी करावी लागणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज