Pune-Shirur Flyover work will start in Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर, नगरपासून जवळ असलेल्या पुणे शहराकडे जाताना शिक्रापुरपासून पुढे मोठया वाहतूक कोंडीला समोरे जावे लागत असल्याने या मार्गावरील प्रवाशांना नेहमीच मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र प्रवाशांची ही डोकेदुखी येत्या काही वर्षात दुर होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्या संकल्पतेतून खराडी बायपास ते शिरूर असा 60 किलोमीटर अंतराचा तीन मजली उड्डाणपुलाच्या कामास एप्रिल महिन्यात सुरूवात होणार असल्याचे खासदार नीलेश लंके यांनी सांगितले.
छत्रपती संभाजी नगर-अहिल्यानगर-पुणे या महामार्गाचे सहा पदरीकरण करून रस्त्याचे काँक्रीटीकरण करावे अशी मागणी खा. लंके यांच्यासह शिरूरचे खा. डॉ. अमोल कोल्हे व छत्रपती संभाजी नगरचे खा. संदिपान भुमरे यांनी मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे यापूर्वीच केलेली आहे. या मागणीच्या पाठपुराव्यासंदर्भात खा. लंके हे संसदेच्या आधिवेशनादरम्यान गडकरी यांच्या भेटीला गेले असता गडकरी यांनी खराडी बायपास ते शिरूर या तीन मजली उडडाण पुलाचे काम लवकरच सुरू होत असल्याचे तसेच शिरूर ते संभाजीनगर दरम्यानच्या रस्त्याबाबत राज्य शासनाशी चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात; करूणा शर्मांनी सुप्रिया सुळेंसमोर मांडली कैफियत
अतिक्रमणे हटविली
शिरूर ते पुणेदरम्यान वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी तीन मजली उड्डाण पुलासंदर्भात मंत्री गडकरी यांनी यापूवच घोषणा केली होती. त्या अनुषंगाने या रस्त्यालगतची अतिक्रमणे यापूवच हटविण्यात आली आहेत.
Delhi New CM : मोठी बातमी! रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री तर परवेश वर्मा उपमुख्यमंत्री
राज्यातील पाहिला तीन मजली रस्ता !
खराडी बायपास ते शिरूर हा राज्यातील पहिला तीन मजली उड्डाणपुल असलेला रस्ता ठरणार आहे. हा अत्याधुनिक एलिव्हेटेड फलायओव्हर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून बांधण्यात येणार आहे.
भाजपकडून निव्वळ ‘ध’ चा ‘मा’, मालवण शिवपुतळा दुर्घटनेप्रकरणी मोदी कधी माफी मागणार?, कॉंग्रेसचा सवाल…
अशी असेल वाहतूक व्यवस्था
तीन मजल्यांपैकी सर्वात वरच्या मजल्यावरून महामेट्रो धावणार असून दुसरा मजला चारचाकी वाहनांसाठी असेल. तळमजल्यावरून अवजड वाहने जातील व येतील. शिरूर, रांजणगांव गणपती, शिक्रापूर, लोणीकंद व खराडी येथे या तीन मजली उडडाणपुलास बाहय मार्ग जोडण्यात येणार आहेत.
राज्य शासनाच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून पुणे ते संभाजीनगर या रस्त्याचे बांधकाम व्हावे यासाठी तीन्ही खासदार आग्रही असताना राज्य शासनाने अलिकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर या रस्त्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून तीन टप्प्यात करण्याची घोषणा केली होती. राज्य शासनाच्या या धोरणास खा. लंके यांच्यासह इतर दोन्ही खासदारांनी विरोध केला असून राज्य सरकारकडून हा रस्ता पुर्ण होईल किंवा नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या महामार्गाचे तीन टप्पे करून त्यावर टोल आकारणे अन्यायकारक असल्याचे नमुद करून त्याचा सामान्यांसह औद्योगिक विकासाला फटका बसेल अशी भीतीही खा. लंके यांनी मंत्री गडकरी यांच्याशी चर्चा करताना व्यक्त केली.