Radhakrishn Vikhe Patil Criticize Nilesh Lanke : निलेश लंके ( Nilesh Lanke ) हे काय बोलतात? याला माझ्या दृष्टीने फार महत्त्व नाही. ज्या-ज्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण होत आहेत. याबाबत जिल्हा प्रशासनाने आराखडा तयार करण्यात आला असून त्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. असं स्पष्ट उत्तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishn Vikhe Patil ) यांनी लंकेंच्या आरोपांना दिले.
‘थोरात दुसऱ्यांची तळी उचलण्यात धन्यता मानतात’, महसूलमंत्री विखेंचा खोचक टोला
राज्यात लोकसभा निवडणुकांसाठीचे मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर नगर जिल्ह्यातला प्रशासनाकडून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने पारनेर तालुक्यातील सोप्या या ठिकाणची अतिक्रमणे ही जमीनदोस्त करण्यात आली. मात्र निवडणुकीनंतर लगेच ही कारवाई करण्यात आल्याने याला कुठेतरी राजकीय वळण प्राप्त झाले. त्यावर पारनेर तालुक्यातील सुपा या ठिकाणची अतिक्रमणावर प्रशासनाकडून जेसीबी चालवण्यात आला व ही अतिक्रमणे जमीन दोस्त करण्यात आली. सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली असा आरोप यावेळी माजी आमदार निलेश लंकेंनी केला होता.
Neha Singh : नेहा सिंहच्या हॉट अदांनी चाहते घायाळ
लंके यांच्या मतदारसंघांमध्ये झालेल्या या कारवाईमुळे राजकीय वातावरण देखील तापले. प्रशासनाकडून सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप माजी आमदार निलेश लंके यांनी लगावला. यावरती उत्तर देताना राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, लंके यांच्या वक्तव्याला फारसं महत्त्व नाही. सार्वजनिक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण झाली आहेत याबाबत जिल्हा प्रशासनाने एक आराखडा तयार केला आहे त्यानुसार अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे.
अनेक ठिकाणी अतिक्रमानामुळे महिलांच्या छेडछाडीचे प्रकार देखील समोर आले आहेत वाहतूक कोंडीचे देखील समस्या समोर येत आहे. यामुळे याला आळा बसावा यासाठी प्रशासनाने कारवाई केली पाहिजे. तसेच ज्यांनी आपला धंदाच भाडोत्री लोकांवरती उभा केला आहे त्यांना वाईट वाटणे स्वभाविकच आहे अशा शब्दात विखे यांनी नामोल्लेख टाळात लंके यांना जोरदार शाब्दिक फटका लगावला.