Download App

लोकसभेसाठी लंकेंची घोषणा; विखेंनी एका वाक्यात विषय संपवला…

Radhakrushna Vikhe On Nilesh Lanke : राज्यात येत्या काळात लोकसभा निवडणुका या होणार असल्याने उमेदवारांकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. यातच महायुतीतील मित्र पक्षाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या पत्नी राणी लंके यांनी नगर दक्षिणमधून लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली. यावर राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe) यांनी भाष्य केले आहे. स्वयंघोषित उमेदवारांना कोण थांबवणार. महायुतीत आहोत, महायुती जो निर्णय घेईल, तो मान्य करायचा, अशा एका वाक्यात मंत्री विखे यांनी लंके यांच्या उमेदवारीच्या चर्चेवर उत्तर दिले. दरम्यान यावर अद्याप आमदार लंके यांनी कोणतेही भाष्य केले नाही आहे.

Nashik Loksabha : ‘मविआ’मध्ये ठाकरेंची मोर्चेबांधणी अन् पवारांचीही चाचपणी | LetsUpp Marathi

राज्यात आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. यातच अनेक इच्छुक उमेदवारांकडून देखील तयारी सुरु करण्यात आली आहे. यातच यंदाची नगर दक्षिण लोकसभा गाजणार असेच चित्र निर्माण झाले आहे. नुकतेच दक्षिण लोकसभेसाठी एकीकडे आमदार निलेश लंके यांचे नाव चर्चेत असताना लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी आप लोकसभा निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केले.

Pakistan : प्रशिक्षक पराभवाला जबाबदार; पाकिस्तानकडून तीन प्रशिक्षकांची सुट्टी!

सध्या राज्यात महायुतीचे सरकार आहे. राष्ट्रवादीचा अजित पवार गट हा सत्तेत सहभागी आहे. निलेश लंके हे महायुतीचे भाग असून त्यांच्या पत्नीने लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र महायुतीचे भाजपचे लोकसभेचे उमेदवार सुजय विखे हे दक्षिण मतदारसंघातून लढणार आहे. राज्यात सध्या तरी महायुतीचे सरकार असल्याने लोकसभेसाठी महायुती उमेदवार देईल असे चित्र आहे. मात्र राणी लंके यांनी घेतलेल्या भूमिकेवरून लंकेकडून लोकसभेसाठी विखेंची कोंडी केली जात असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

Ahmednagar News : निवडणुकांच्या तोंडावर विखेंकडून निधी मंजुरीचा धडाका; जिल्हा विकासासाठी 630 कोटी मंजूर

महायुती जो निर्णय घेईल, तो मान्य करायचा…
राणी लंके यांनी नगर दक्षिण मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. यावर मंत्री राधाकृष्ण विखे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारण्यात आले असता त्यांनी लंके दाम्पत्यावर खोचक टिप्पणी केली आहे. स्वयंघोषित उमेदवारांना कोण थांबवणार. महायुतीत आहोत, महायुती जो निर्णय घेईल, तो मान्य करायचा. महायुतीचा धर्म पाळून पक्षश्रेष्ठींकडून घेतलेले निर्णय सर्वांना मान्य करावे लागतील, असे यावेळी बोलताना विखे यांनी म्हंटले. दरम्यान यावर आता आमदार निलेश लंके यांची काय प्रतिक्रिया येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार

follow us