Download App

मतदारसंघात शिवाजीराव कर्डिलेंची ताकद वाढली; शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश…

राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवाजीराव कर्डिले यांची ताकद वाढली असून पाथर्डी तालुक्यासह जेऊर-धनगरवाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

Shivajirao Kardile News : राज्यात विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) रणधुमाळी सुरु झाली असून पक्षांकडून आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. भाजपकडून पहिल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातून जिल्हा बॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांना उमेदवारी देण्यात आलीयं. कर्डिलेंना उमेदवारी जाहीर होताच मतदारसंघातील विविध क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाजपात सामिल होत आहेत. त्यामुळे कर्डिले यांची ताकद वाढत आहे. शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन पाथर्डी तालुक्यातील शिराळ चिचोंडी इथल्या कानिफ बुटे मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांसह जेऊरमधील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केलायं.

भाजपचे माजी मंत्री राष्ट्रवादीच्या गळाला; राजकुमार बडोलेंच्या हाती ‘घड्याळ’

पाथर्डी मार्केट कमिटीचे संचालक वैभव खलाटे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला असून यामध्ये शिराळ सोसायटीचे चेअरमन हनुमंत घोरपडे, मिठू मुळे, भाऊराव आव्हाड, जयदीप तुपे, कानिफ (बंटी) बुटे, तेजस तुपे, ज्ञानेश्वर बोंगाणे, प्रताप वाघ, वैभव गडाख, प्रवीण आव्हाड, विजय आव्हाड, शुभम गर्जे, साईनाथ तुपे, ऋषिकेश वाघ, महेश आव्हाड कानिफनाथ पालवे, दत्तात्रय बुटे, सुहास गडाख, विशाल मुळे, आकाश गोरे अमोल वाघ, नंदनवन गायकवाड, नंदणवन गायकवाड,ऋतुराज कराळे प्रशांत कराळे आदी कार्यकर्त्यांनी प्रवेश केलायं.

माझ्या ‘राजाराणी’ चित्रपटावर अन्याय होतोय; सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्या, सुरजची चाहत्यांना भावनिक साद

तसेच जेऊर-धनगरवाडी भागातील अनेक कार्यकर्त्यांनीही प्रवेश केला आहे. यामध्ये बाळासाहेब वाघ, बापू तागड, नवनाथ म्हस्के, कैलास शिकारे, संदिप कापडे, अनिल जाधव, कृष्णा शिकारे, पराजी नायन, अविनाश तागड, अनिकेत गवळी, सोमनाथ गायके, सार्थक गायके, कुणाल गवळी, संकेत गवळी, संदिप शिकारे, भाऊराव रसाळ, पांडूरंग मंचरे, शंकर शिकारे, पोपट बर्डे, चंद्रभान आढाव, यांनी कर्डिले गटात प्रवेश केलायं.

नार्वेकरांच्या अमित शहांना शुभेच्छा! उद्धव ठाकरे अन् भाजप संघर्षाचा दाखला देत सोशल मीडियावर टीका

दरम्यान, राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघात मागील अनेक वर्षांपासून शिवाजी कर्डिले यांचा दांडगा जनसंपर्क आहे. या मतदारसंघातून कर्डिले सलग दोनवेळा विधानसभेवर गेले आहेत. या मतदारसंघात विद्यमान आमदार असताना शिवाजीराव कर्डिले यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य दिलं. त्यामुळेच आज कर्डिले गटात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची इनकमिंग सुरु असल्याचं दिसून येत आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून कर्डिले यांच्या उपस्थितीत दररोज कार्यकर्त्यांचा प्रवेश होत आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत शिवाजीराव कर्डिले यांचाच विजय होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

follow us